अणुविज्ञान वर ही लिंकही बघा -- http://anu-vigyan.blogspot.nl/2009/02/blog-post_22.html
संगणक पदनाम कोश
अर्थ व्यवहार (महाराष्ट्र टाइम्स) दिनांक २६.१.८७
अवचित दारी आलेल्या पाहुण्याप्रमाणे संगणकाचे भारतात आगमन झाले असून, प्रत्येक जण आपल्या कार्यालयांत तो कधी येईल, याची वाट पाहात आहे. संगणक आपल्या कार्यालयात लवकच रूढ होणार, त्यामुळे संगणक पदनाम कोशाची आपण ओळख करून घेतली पाहिजे. त्याची कार्यकक्षा व मर्यादा माहीत असली की कार्यालयातील नेमके कोणते काम संगणकावर सोपविता येईल, याचा अंदाज येऊ शकेल.
संगणकाकडे स्मरणशक्तीचा प्रचंड साठा असतो. त्या साठयामध्ये आपल्याला पुढे मागे किंवा नेहमी लागणारी माहिती सवडीने भरून ठेवायची. जेव्हा जेव्हा ती माहिती लागेल, तेव्हा फायलींचा ढिगारा उपसावा न लागता, ती माहिती आपल्याला मिळू शकते. संगणकामधील गणितीय उलाढाल करणारा भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा मेन मेमरी किंवा विवेचक आणि माहितीचा साठा करून ठेवणारा भाग-मेमरी स्टोरेज यापैकी माहिती संग्राहक तीन त-हेचा असू शकतो. प्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक टेप किंवा मॅग्नेटिक डिस्क कुठल्याही संगणकाचे वर्णन सांगताना, त्याची संग्रहणशक्ति ३६० किलो वॅट आहे. किंवा ८० मेगाबाइट आहे, असा उल्लेख असतो.
संगणकाच्या आतील भागात अत्यंत सूक्ष्म शक्तीच्या विद्युतधारा प्रवाहित होत असतात. सोर्स कोडमध्ये सर्व संदेश फक्त डॉट आणि डॅश यांचा वापर करून दिले जातात. तोच प्रकार संगणकाचा विद्युतधारा नसेल तेव्हा शून्य(०) वाचायचे व धारा असेल तेव्हा त्याला। वाचायचे. या प्रत्येक स्थितीला एक बिट असे म्हणतात. असे सहा किंवा नऊ बिट एकत्र करून वाचले, तर मात्र आपण त्यातून शून्य किंवा एकाच्या पलिकडील अर्थ काढू शकतो. उदाहरणार्थ,
सहा बिट एकत्र करून वाचणारी एखादी 'सिस्टम' असेल, तर त्यावर 000001 हा पॅटने म्हणजे ए ००००१० म्हणजे बी, ०११०१० म्हणजे झेड असा अर्थ लावला जाऊ शकतो. अशा एका पॅटर्नला एक 'बाईट' म्हणतात. एक किलो बाईट म्हणजे १०२४ बाइट. पण सुटसुटीतपणासाठी त्यांचा उल्लेख हजार वाइट असाच करतात. तसेच एक मेगाबाइट म्हणजे १००० १०००(प्रत्यक्षात १०२४ १०२४) बाइट, तर एक मेगाबाइट म्हणजे १००० १००० १००० (किंवा १०२४ १०२४ १०२४) बाइट, एक अक्षर किंवा एक एक आकडा किंवा एक खूण (इत्यादी) एका बाइटने दर्शवतात.
संगणकाचे बाहयदर्शी भाग म्हणजे की-बोर्ड, स्क्रीन आणि प्रिंटर, पैकी की-बोर्ड हा इतर सर्व आर्ठपरायटरच्या की-बोर्ड प्रमाणेच असतो व त्याच काही जास्त की असतात. आपणाला हवी असलेली माहिती आपण स्क्रीनवर वाचू-पाहू शकतो. स्क्रीनवरील माहिती आपल्याला वेगळया कागदावर टाईप करून हवी असते, त्यासाठी संगणकाला प्रिंटर जोडलेला असतो. प्रिंटरवरची अक्षरे जर ठिपक्यांच्या पद्धतीने अमटत असतील, तर त्याला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणतात. याचा वेग कमी असतो परंतु प्रिंटर सुटसुटीत असतो.
सुविधा
इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरमध्ये आपल्या साध्या टंकनयंत्राप्रमाणेच एक की-बोर्ड असतो, शिवाय एक ओळभर
मसुदा दिसू शकेल, एवढा एक स्क्रीन असतो. त्यामुळे किरकोळ चुका तिथल्यातिथे दुरूस्त होऊ शकतात. अक्षरांमधील जागा आपोआप कमी-जास्त करणे, समास निश्च्िात करणे, हवे ते अक्षर अधोरेखित किंवा मोठे करणे या सुविधा असतातच. साधारण टंकयंत्रात प्रत्येक अक्षराची एक काडी असते व या सर्व काडया यंत्रात थ्ुट बसवलेल्या असतात. त्याऐवजी इलेक्टॉनिक टंकयंत्रात एका गोल चकतीवर सर्व अक्षरे बसविलेली असतात. ही चकती (डेझी-व्हील) काढून, केव्हाही दुसरी चकती सहजपणे बसवता येते. यामुळे वेगवेगळया टाईप शैलीची अक्षरे वापरता येतात. कधी डबल साईझा, तर कधी साधी, कधी इटेलिक्समध्ये अशा १०-१२ प्रकारच्या करत्या सध्या बाजारांत उपलब्ध आहेत व देवनागरी लिपीतील चकत्याही मिळू लागल्या आहेत.
यामुळे आपण जी पत्रे लिहितो ती एकदम आकर्षक व शैलीदार बनतात.
अशा या इलेक्ट्रानिक टंकयंत्राची सुधारित आवृत्ती म्हणजे वर्ड प्रोसेसर. यातील स्क्रीन छोटया टी.व्ही. स्क्रीनइतका मोठा असल्याने, २०-२५ ओळींचा मजकूर आपण एकत्र पाहून दुरूस्त करू शकतो. शिवाय, याला नुसताच संग्राहक मेंदू नसून, संगणकाचा अविभाज्य घटक असलेले सेंट्रल प्रोसेसिंग युनिटही असते. त्यामुळे जणू काही आपल्या पी.ए.ला आदेश द्यावेत त्याप्रमाणे आपण वर्ड प्रासेसरला भराभर आदेश देऊ शकता. उदाहरणार्थः पाचवी ओळ पूसून टाक, तिस-या पानावरचा दूसरा परिच्छेद चवथ्या पानाच्या तिस-या परिच्छेदानंतर टाक इत्यादी.
पुष्कळ कार्यालयांतील कामाचे स्वरूपच असे असते की, त्यांना भरपूर लिखाण करायचे असते. याला वर्ड प्रोसेसर फार उपयोग पडतो.
कॅरॅक्टर
संगणकाला फक्त धारा असणे किंवा नसणे या दोनच अवस्था कळतात. अशा एका अवस्थेला एक बिट म्हणतात व प्रत्येक बिट हे ० किंवा। यापैकी कुठल्यातरी एका आकडयाने दर्शविले जाते. परंतु अशी ६ किंवा ८ किंवा ९ बिट्स मिळून एक निश्च्िात अक्षर बनवतात. प्रत्येक अक्षराला एक बाइट किंवा कॅरॅक्टर असे म्हणतात. इंग्लिशमधील अे ते झोड या अक्षरांना अल्फा कॅरॅक्टर व १,२,३,.....९ पर्यन्त आकडयांना न्यूमिरिक कॅरॅक्टर म्हणतात. याशिवाय भाषेत वापरल्या जाणा-या सामान्य विन्हांसाठी सुद्धा एक एक बाइट किंवा कॅरॅक्टर वापरतात. उदा. :---'' ():/.
की-बोर्डावर ही अक्षरे दाबली की, संगणकाच्या आत नेमके कसे बिटस किंवा बाइटस निर्माण होतील हे ऑपरेटिव्ह सिस्टम वरून व संगणक हार्डवेअर बनत असतानाच ठरते.
आपल्याला जे सांगावयाचे ते संगणकाला कळण्यासाठी,
आपण काही ठराविक भाषा वापरावी लागते. या भाष्ज्ञा बेसिक कोबोल, पास्कल, फोरटोन इत्यादी आहेत. ज्या त्या भाषेचे सॉप्टवेटर प्लॉपी डिस्कमार्फत संगणकाच्या संचयिकेत भरले गेले की, संगणकाला त्या त्या भाषेमध्ये आपले संदेश दिले जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक भाषेत काही राखीव शब्द असतात. त्या शब्दांचा खास अर्थ संगणकामार्फत लावला जात असतो व त्याबरहूकूम काही खास कामे संगणकाने करायची असतात. त्यामुळे कोणत्याही भाषेत प्रोग्रॅम करीत असताना राखीव शब्द फक्त खास सूचनेसाठीच वापरले जातात. इतर सामान्य शब्दांप्रमाणे नाहीत.
सरकारी कार्यालयातील कामे एकसारखीच असतात. उदाहरणार्थ,
पगार बिल बनवणे, जनगणना इत्यादीं सारख्या बाबींवर कित्येक वर्षांचा एकत्र तुलनात्मक अभ्यास करणे इत्यादी. मग एक खास प्रोग्रॅम बनवला जातो की, ज्यागोगे प्रत्येक कार्यालयात तोच प्रोग्रॅम वापरला जाऊ शकेल. ते काम होऊ शकेल अशा खास प्रोग्रॅम्सना पॅकेज म्हणतात. उदा. चेस पॅकेज संगणकाच्या माहिती संचयिकेत चढविले की, एका बाजूने संगणक व दुस-या बाजूने आपण असा बुत्रिबळाचा खेळ खळला जाऊ शकतो.
प्रोग्रॅम
प्रोग्रॅम म्हणेजे काय, तर एका पाठोपाठ एक नेमकी काय कृती करायची याची सूसंगतवार यादी करून संगणकाला देणे. समजा आपल्याला टक्केवारीची दहा गणिते करायची आहेत, तर संगणकाला प्रोग्रॅम बनवून देण्याची पद्धत कशी बारकावेयुक्त असते ते पहा.
संगणकाला दिलेल्या सूचना किंवा प्रोग्रॅम : 1. अनुक्रमांक 1 लिही. २. प्रत्येक गणितानंतर पुढला क्रमांक मांडत चल. ३. १० अनुक्रमांक संपले की (११) बरहूकूम कारवाई कर.४. मूळ आकडा विचार. ५.
टक्केवारीचा दर विचार. ६. उत्तरउमूळ आकडा दरः- १०० हे सूत्र लक्षात घे. उत्तर काढ. ८. उत्तर स्क्रीनवर दाखत. ९. उत्तर कागदावर प्रिंट कर. १०. गणित संपले- पुढील गणितासाठी पुढील अनुक्रमांक मांडून, पुन्हा ४ येथील सूचनेप्रमाणे काम कर. ११. काम संपले, आता धांब.
प्रोग्रॅमध्ये म्हटलेल्या १० गणितांसाठी जे दहा मूळ आकडे व टक्केवारी असतील, ते संगणकाच्या 'मास्टर फाइल' नावाच्या एका वेगळया फाइलसाठी प्लॉपीवर भरून ठेंवणे, म्हणजेच 'डाटा फीडींग' आकडेवारी संगणकाला आधीच देवून असेल, तर प्रोग्रॅम सुरू करण्याची सूचना देताच, आकडा व टक्केवारी आपल्याला न विचारता मास्तर फाइलमधून आपोआप घेतली जाते व आपल्याला उत्तरे काढून मिळतात.
याचप्रकारे रोजगार विनिमय केंद्रांभधील उमेदवारांची नावे, वय, तालुका, जिल्हा, शिक्षण, जात वगैरे माहिती विविध स्वरूपात मिळू शकते.
फ्लॉपी
व्यक्तिगत संगणकात दोन प्लॉपी डिस्क बसू शकतील अशी व्यवस्था केलेली असते व त्यातील प्रत्येक डिस्कसाठी एक ड्रायव्हिंग मोटर असते, ज्यायोगे डिस्क वाचली जाऊ शकते. डिस्क वाचली जाणे हा प्रकार म्हणजे टेपरेकॉर्डरवर कॅसेट वाजून गाणे ऐकू येण्यासारखाच असतो. तसेच या प्लॉपी डिस्कवर काहीही लिहिले जाऊ शकते. दोनापैकी एका डिस्कवर संगणकासाठी खास सूचना असतात. तर दुस-या प्लॉपीवर आकडेवारी भरून ठेवता येते. ५ १/४' लांबीच्या चौकोनी प्लॉपीची किंमत ६० ते ८० रू. पडते. अशा एका प्लॉपीमध्ये साधारण ३६० किलो बाइटस् बसू शकतात. यालाच डिस्क कपेसिटी ३६० केबी असे म्हणतात. मात्र डिस्क कपॅसिटी संगणकाचा विवेचक एका वेळेला जेवढी माहिती वाचू शकतो ती विवेचकाची क्षमता भिन्न भिन्न असते. विवेचक क्षमतेस 'रॅम' म्हणतात. सहा महिन्यांपूर्वीच्या व्यक्तिगत संगणकामधील बहुतेक सर्व मॉडेल्सची विवेचक क्षमता ६४० केबी पर्यन्त होती. आता मात्र वाढीव विवेचक व्यक्तिगत संगणक शक्तिचे मिळू लागले आहेत.
ज्या कार्यालयात मास्टर डाटा फार मोठा असेल, तिथे जास्त विवेचक शक्तीचा संगणक लागतो. साधारणपणे एखाद्या लघुसंगणकाची विवेचक शक्ती ३ एम.बी. पर्यन्त असू शकते. जास्त साठयासाठी मॅग्नेटिक डिस्क बरोबरच जादा मॅग्नेटिक टेप्स वापरून आकडेवारी भरून ठेवली जाते. प्रिंटर्स देखील मिनिटाला ९०० ओळी छापणारे वापरले जातात.
याहीपेक्षा तुलनेने फारच वरचढ म्हणजे महासंगणक. आपल्या देशात जपानच्या सहायाने नुकतेच चार महासंगणक बसवले आहेत. त्यातील एक पुण्याला आहे. याची विवेचक शक्ती १६ एमबी आहे. तेथील प्रिंटर्सची गती मिनिटाला १६०० ओळींइतकी आहे. संपूर्ण देशातील कृषि उत्पन्नविषयक माहिती ठेवण्याचे काम हा संगणक करणार आहे, असे कळते. यावरून आपल्याला संगणकाची मर्यादा व त्याच्याकडून होणा-या कामाची कल्पना येते.
--------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें