वैज्ञानिक दृष्टिकोणासाठी -- तरुणाई-४
आपला देश सध्या तरी विज्ञान विषयांत इतर प्रगत देशांच्या मानाने खूप मागे आहे आणि याचसाठी लोकांमधे विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोण बाणवण्याची संधि आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे कांय त्याचा थोडा उहापोह या घटनेच्या माध्यमांतून करू या.
कॉलेजजीवनांत खूप जणांचे स्वप्न असते रिसर्चचे -- पण रिसर्च कसा करायचा ही शिकवण फारशी दिली जात नाही. आपल्या देशांत खूप चांगल्या पद्धतीचे रिसर्चही होत नाही. विज्ञान विषयांत इतर प्रगत देशांच्या मानाने आपण खूप मागे आहोत. आपल्याला मोठा रिसर्च करायला मिळेल किंवा न मिळेल पण वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर छोट्या प्रसंगातूनही कांही तरी साध्य करता येते. हा दृष्टिकोन लहान मुलांत, आणि सामान्य माणसांत देखील आला पाहिजे. याचसाठी लोकांमधे विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोण बाणवण्याची संधि आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे कांय त्याचा थोडा उहापोह या घटनेच्या माध्यमांतून करू या.
घटना विचारणीय आहे -- मजेशीर म्हणूया हवीतर. त्यातून आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे त्याची कल्पना येते. १९९४-९५ मधे मी नाशिक येथे महसूल आयुक्त असतांना घडलेली ही सत्यघटना आहे.
१९९५ मधे नाशिक विभाग दुष्काळग्रस्त होता. सर्वच तालुक्यामध्ये पर्जन्यमान
कमी झाले. पिके जळाली. मोठे नुकसान झाले.रबीचे पीक बरे आल्यामुळे वर्ष
अखेरीला लोकांना दिलासा मिळाला पण दुष्काळाची भयछाया लोकांच्या मनावर राहून
गेली. त्यांत एकूण पाऊस कमी झाल्याने विहीरींचे पाणी आटले होते. त्यामुळे
पुढच्या वर्षी नव्या विहीरी खणण्याची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे GSDA म्हणजे ground water survey authority या नावाचे एक सरकारी
खाते असते. त्यांच्या मार्फत दरवर्षी ब-याच विहीरी खोदल्या जातात.त्यातील
सुमारे ८० टक्के सरकारी खर्चाने असतात, त्यामुळे त्यांनी पाण्याची शक्यता
पडताळली, विहीरी खणल्या आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्याचे फारसे
वैषम्य कुणाला वाटत नाही, कित्येकदा त्याची माहिती कुणाला मिळत नाही. खुद्द
त्या खात्याकडे अभ्यासकाच्या दृष्टीने ही सर्व माहीती मांडून त्यांचे
यशस्वी - अयशस्वी हे गणित मांड़ले जाते कां? हा वेगळा प्रश्न आहे. पण जरी
तस होत असल तरी त्याची माहीती लोकांपर्यंत नसते. म्हणून लोकांचा ठोकताळा
असा कि, त्यांनी पडताळा करून पाणी आहे असं सांगितल्या जागांपैकी पन्नास
टक्के विहीरीच यशस्वी होतात. त्या विभागाची सांख्यिकी माहिती जाहीर करण्याने देखील वैज्ञानिक दृष्टिकोण येईल असो.
पण जेंव्हा शेतक-यांना
स्वत:च्या खर्चाने विहीर खणायची असते तेंव्हा मात्र त्यांना यापेक्षा जास्त
मोठी गॅरंटी हवी असते. अशावेळी ते एखादा पानाडा गाठतात.
पानाडे,
बैदू, ज्योतिषि या सर्वांना आपण एकाच तराजूत टाकतो - त्यांना आपण एकच
बिल्ला लावतो - अंधविश्वास. आपण म्हणजे असा सुशिक्षित समाज ज्याला वाटते की
ज्ञान हे फक्त शाळेच्या सर्टिफिकेट मधेच असते. पण माझे मत थोडे वेगळे आहे.
जेव्हा GSDA नव्हते तेंव्हा कोण होते? हे पानाडेच तेंव्हा शेतक-याला
पाण्याची जागा सुचवत. त्यांचेही सल्ले खुपदा चुकत. फरक असा असतो की, असे
पानाडे प्रयोगाशील नसतात. त्यांनी कांय पाहीले आणि एखाद्या जागेत पाणी
असल्याचा निष्कर्ष कां काढला, ते कोणाला सांगू इच्छित नाहीत कारण ते ज्ञान
गुप्त राहण्यानेच त्यांचा धंदा चालणार असतो. त्याचबरोबर त्यांचा अंदाज कुठे
कुठे चुकला त्यावर चर्चा करायला ते तयार नसतात कारण त्याहीमुळे त्यांचे
गि-हाईक दूर जाईल व धंदा मारला जाईल अशी त्यांना भिती असते. ही भिती घालवून
त्यांच्या कामातील चांगले निष्कर्ष शिकून घेणे हे समाजाला जमत नाही कारण
सगळेच पानाडे कांही खरेपणाची कांस धरत नाही. गि-हाईक टिकवण्यासाठी ते खूपसे
फोल दावे करीत असतात. हा तिढा जरी असला तरी शेतक-यांच्या दृष्टीने विचार
केला तर GSDA कडून पाणी शोधून घेण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ (व
तरीही यशाची पूर्ण गॅरंटी नाहीच) बघता त्याला पानाडा जास्त परवडतो. शिवाय
यातला खरा खर्च हा GSDA किंवा पानाड्याच्या फी चा नसून खरा खर्च हा
प्रत्यक्ष विहीर खणण्याचा असतो. त्यासाठी शेतकरी जर पानाड्यावर जास्त भरवसा ठेवत असेल तर त्यातले चांगले काय हे नक्कीच शोधायला हवे.
असो, तर या सर्व कारणांनी
1996 मधे शेतक-यांकडून पानाड्यांना मोठी मागणी होती. धुळे जिल्ह्यातील एक
पानाडा जास्त यशस्वी होता- त्याला अहमदनगर जिल्ह्यांत बरीच मागणी येऊन तो
या भागात फिरत होता. इतर विहीरींनाही बघत असे. त्याने पाहीले की
विहीरींचे पाणी आटले आहे. खरे तर कुणीही हेच पाहील कारण उन्हाळ्यामुळे
मार्च-एप्रिल महिन्यांत सर्वच विहीरींचे पाणी आटते. पण याने सांगायला
सुरुवात केली की ज्या "पॅटर्न" ने या संगमनेर तालुक्यातील पाणी आटले आहे,
त्याच "पॅटर्न" ने पाच वर्षांपुर्वी लातूर जिल्ह्यातील विहीरींचे पाणी आटले
होते व म्हणून मला अशी धोक्याची सूचना दिसते की मे महिन्यात इथेही भूकंप
येणार आहे.
आता पाणी आटण्याचा "पॅटर्न" म्हणजे कांय?
त्याला नेमके कांय म्हणायचे होते? पण असा सुसंवाद घडू शकत नाही कारण
प्रत्येक सुशिक्षित माणूस त्याला अंधश्रद्ध, बोगस, असेच विशेषण लावणार व त्यामुळे सुसंवाद टळणार. बरे
त्यानेही हे प्रसिद्धीसाठी केले नसेल कशावरून - त्याने खरच काही "पॅटर्न"
ओळखला होता की थापा मारत होता? त्याच्याशी सुसंवाद होत नाही तो पर्यंत हे
कसे कळणार होते?
तर दोन-तीन गावांमधून हळूच बातमी आली
कि पानाड्याच्या निदानावरून मे महिन्यात- सुमारे तेवीस तारखेस -भूकंप
येणार. या बातमीने हळू हळू वेग घ्यायला सुरुवात केली. जे शेतकरी नव्हते,
गांवकरी नव्हते- शहरात होते- सुशिक्षित होते- सुरक्षित आहोत असे ज्यांना वाटत होते -- सरकारी होते- त्यांनी म्हटले-
अफवा आहेत झाल- मूर्खासारख त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. पण एवढ्या
"तुच्छतेच्या" शे-यांनी गांवक-यांचे समाधान होत नव्हते. बातम्यांनी जोर
धरला. बरेच लोक तीन-चार महिन्यांसाठी गांव सोडून जाण्याचे ठरवू लागले, तर
काही विमा कंपन्यांनी- 'भूकंप येऊन नुकसान झाल्यास" या पद्धतीने विमा
उतरवायला सुरुवात केली.
मग एक दिवस त्या भागातील DIG श्री
भुजंगराव मोहिते माझ्याकडे चर्चेला आले. त्यांचे म्हणणे होते- आपण शासनाकडून जादा
पोलिस फोर्स मागवून ठेऊ - खरोखर भूकंप आला तर आपल्याला रिलीफ कामाला माणसे
लागतील. त्यांचे दुसरे मत होते की त्या पानाड्याविरुद्ध अफवा पसरवल्याचा
गुन्हा दाखल करून त्याला कैदेत टाकायचे. पण चर्चेअंती हे दोन्ही उपाय
निरर्थक असल्याचे ठरले. पानाड्याला अटक केली आणि खरेच भूकंप आला तर? शिवाय
जर त्याला खरेच कांही "दिसले" असेल तर लोकांना धोक्याची सूचना देणे हे चूक
नाही. सच्चेपणाने जाणवलेल्या धोक्याची सूचना देणे आणि अफवा पसरवणे यांत
किती थोडा फरक असतो. तरीही त्याला बोलावून त्याला खरोखर कांय "दिसले" ते
विचारायला हवे होते. त्याचा शोध घेतला तेंव्हा आता पोलिस कैद करतील या
भितीने तो गांव सोडून गेला होता व त्याचा ठावठिकाणा कोणाला माहित नव्हता.
त्यामुळे ते समजून घेण्याचा मार्गही खुंटला.
एव्हाना अफवा जोरात होत्या आणि वर्तमानपत्रांतील बातम्या वाढत होत्या.
या सर्व अज्ञानावर कांही वैज्ञानिक उपाय असू शकतो का? केंद्र
शासनाअंतर्गत भूवैज्ञानिकी या विभागाकडे पृथ्वीच्या पोटातील हालचाली,
भूकंपाची शक्यता, इत्यादी "सेस्मोलॉजिकल" माहितीचा वेध घेणारी शाखा आहे.
त्यांच्या डायरेक्टरना फोन करुन मी समस्या सांगितली- की या अफवेमुळे व
विशेषत: मागे येऊन गेलेल्या लातूर भूकंपामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण
आहे व त्याचे निराकरण व्हावे. त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की ही सर्व माहिती गुप्त असते (कां?) कारण याचा
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंध आहे पण इथे कायदा-सुरक्षेचा प्रश्न असल्याने ते रिपोर्ट आम्हाला पाठवायला तयार झाले -- कोणते -तर त्यांचे एक छोटेसे
सेंटर देवळाली येथे आहे व तिथले निष्कर्ष आम्हांला सांगण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले. असे
दोन-तीन "रिपोर्टस" पाहून आमच्या ध्यानात आले की गोळा केली जाणारी माहिती
देवळालीच्या अगदी जवळपास मर्यादित होती, संगमनेर पर्यंत त्या मशिनची रेंज
नव्हती. शिवाय त्या मशिनने गोळा केलेले सिग्नल दिल्लीला पाठवले जात व तिथून
दोन केंद्राच्या माहिती बरोबर लिंकिंग करुन निष्कर्ष काढला जात असे आणि या
सर्व प्रक्रियेला तीन-चार दिवस वेळ लागत असे.
मी पुन्हा डायरेक्टरना फोन केला की आम्हाला याचा उपयोग नाही. आधी त्यांनी नकारात्मकच उत्तरे बोलून दाखवली- पहिला मुद्दा- "ही सर्व माहिती गुप्त असते" (कां?) "कारण याचा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंध आहे" - मी कबूल केले. "आम्ही कुणालाही माहिती सांगत नाही" - मी म्हटले नाकबूल, इथे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या पॅनिक होण्याचा प्रश्न आहे. शेवटी ते कबूल झाले की त्यांचे एक मोठे यंत्र संगमनेर- गांवात बसवले जाईल व डेटा गोळा केला जाईल- "पण यंत्राच्या सुरक्षेची काय व्यवस्था?"
त्यावर मी त्यांना एका शाळेची इमारत मिळवून
देण्याचे कबूल केले व खुद्द आमदार बाळासाहेब थोरात (आता मंत्री) यांच्याच
शाळेची जागा दाखवली. या नव्या यंत्रामधे तीन वेगवेगळ्या व दूरदूरच्या
जागांचे भूगर्भातील धक्के नोंदवून त्यांचा तिथल्या तिथे निष्कर्ष काढून
ग्राफवर प्लॉट करायची सोय होती. ते मशीन आले, बसवले, चालू केले
तेंव्हा मी पहायला गेले. तिथे आलेल्या ज्युनियर वैज्ञानिकांनी मला व चार-सहा मोजक्या व्यक्तींना आत येण्याची "परवानगी"
देऊन मशीनचा कारभार, त्यामधे निघणारे ग्राफ व त्यावरुन पृथ्वीच्या पोटातील लहान मोठ्या झटक्यासंबंधी काढायचा निष्कर्ष हे सर्व दाखवले व
आतापर्यंतचे सर्व निष्कर्ष "नॉर्मल" आहेत असेही आश्वासन दिले.
मग
पुन्हा एकदा माझा डायरेक्टरांशी संवाद झाला. तुम्ही ती खोली "टॉप सिक्युरिटी
सिक्रेट झोन" ठेऊ नका हा माझा आग्रह होता. येऊन जाऊन एक महिन्याचा प्रश्न
होता. मे अखेर किंवा जून मध्यापर्यंत भूकंप आला नाही तर सगळी भिती आणि अफवा
बाजूला ठेऊन सगळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार होते. त्यामुळे तेवढा एक
महिना त्या एका सेंटरचा डाटा जाहीर झाल्याने देशाच्या सुरक्षेला कोणताही
धोका नव्हता. एखादा विचित्र "पॅटर्न" दिसला तर तो "सिक्रेट" करण्याची मुभा
तिथल्या वैज्ञानिकांना द्या, पण एरवीचा डाटा सर्वांना मोकळेपणाने पाहू
द्या- विशेषत: शाळेच्या मुलांना तर हे मशीन कांय आहे- कसे असते वगैरे सर्व
पाहू द्या. असा मी आग्रह धरला. नाहीतरी तिथे ड्यूटीवर असलेल्या वैज्ञानिकांना तासन- तास मशीन
मधून सरकत निघणा-या व ECG प्रमाणे दिसणा-या त्या ग्राफकडे बघत
रहाण्यापलीकडे दुसरे कांय काम होते? त्यापेक्षा शाळेतील उत्साही मुलांना
भूगर्भशास्त्रांची तोंडओळख करुन देण्याची ही किती तरी चांगली संधी हाती आली
होती. शेवटी या सर्वांना ते डायरेक्टर कबूल झाले आणि तेंव्हापासून पुढे
महिनाभर त्या मशिनला किती शाळकरी मुलांनी भेट दिली त्याची गणतीच नको. मला
नंतर किस्सा ऐकण्यांत मिळाला की या घटनेच्या शेवटी जेंव्हा मशिन काढून नेत
होते तेव्हा कांही मुले चक्क रडली होती. असो.
मशीन बसले,
त्याचे काम, त्यामधून निघणारे ग्राफ हे ही सर्वसामान्य माणसाने स्वतः
बघण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ग्राफ नॉर्मल आहेत हे कळल्यामुळे भीतीचे
वातावरण हळू हळू कमी होत होते. त्या एका महिन्यांत या मशीनबद्दल व
भूगर्भशास्त्राबद्दलही वर्तमानपत्रांतून लेख लिहीले गेले. पण दुसरीकडे त्या
पानाड्याने वर्तवलेली तारीखही जवळ येत होती, त्यामुळे मधूनच भीती पुन्हा
वाढत होती.
अशात पुन्हा एक बातमी आली कि एका गांवातील एक भला
मोठा वृक्ष "जमिनीत खचला". एक माणूस रोज पहाटे त्या वृक्षाखालून शौचाला
जात असे- त्या दिवशी वृक्षाची एक फांदी त्याच्या डोक्याला आदळली, म्हणून
वृक्ष खचल्याचे सिद्ध होते अशी ती बातमी होती. तो वृक्ष खचतच चाललाय अशी
बातमी दुस-या दिवशीही पसरली. ह्याचे निराकरण अगत्याचे होते. म्हणून मी
तहसिलदारांना फोन केला- साहजिकच त्यांच्याकडे वृक्ष खचला की नाही हे
समजण्याचे साधन नव्हते. मी त्यांना सुचवले की "वृक्षाच्या बुंध्यावर रंग
द्या. अगदी जमिनीलगत फूटपट्टीने मोजून ६ इंच चुन्याचा पांढरा रंग,
त्याच्यावर गेरुचा रंग ६ इंच, त्यावर पुन्हा चुन्याने 6 इंच असे त्या झाडावर पट्टे-पट्टे रंगवा
म्हणजे झाड खचले अगर न खचले ते सर्वांना लगेच समजेल". त्याप्रमाणे
तहसिलदारांनी लगेच त्याच दिवशी झाडालगतचा झाडोरा साफ करून घेतला, जमीन पण
शक्यतो सपाट केली आणि बुंध्यावर चुना व गेरुने आलटून पालटून पट्टे ओढले.
दुस-या दिवशी वर्तमानपत्रांनी ती बातमी पण छापली. पुढील तीन-चार दिवसांत
जेंव्हा झाड खचत नसल्याची खात्री झाली तेंव्हा मी अहमदनगर जिल्हाधिकारी
यांना सूचनी दिली की त्यांनी आकाशवाणीवरून संदेश द्यावा कि या सर्व अफवा
आहेत. संगमनेरमधले सेस्मिक व्हायब्रेशन मोजणारे मशीन आणि हे न खचलेले झाड
हेच दाखवते, तरीही कांही दुर्घटना झाल्यास शासन सज्ज आहे वगैरे. मेधा
गाडगीळ त्यावेळी जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी हा संदेश दिला.
ते झाड खचत नाही म्हटल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता. तरी पण
वर्तमानपत्रांनी "झाड खचलेले नाही- धोका नाही" ही बातमी देणे चालूच ठेवले
होते. दूरदर्शनची खास टीम येऊन त्या झाडाचे शूटींग करून गेली व त्यांनी ही
बातमी वापरली.या सर्व प्रकारांतून मला जाणवले की अज्ञानाचे मूळ कशात आहे.
माहिती एकमेकांपर्यंत न पोचू देणे, व असलेल्या माहितीची चिकित्सक बुद्धिने
परीक्षा न करणे म्हणजेच अज्ञान. त्या विरूद्ध विज्ञान म्हणजे लोकांना
माहिती देत राहणे, व त्यांच्या शंका घालवणे. जर सेस्मोलॉजी खात्याने
त्यांच्या संगमनेर मध्ये बसवलेल्या यंत्राचे ग्राफ सर्वांना खुले ठेवले
नसते तर एवढे मोठे, उत्तम, यंत्र जवळ असूनही त्यांनी अज्ञानच पसरू दिले असे
मी म्हटले असते. त्यांचा सर्व डाटा, बहुतेक प्रसंगी "सीक्रेट " ठेवणे हे
जरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असले तरी त्या बाबतचे विज्ञान
लोकांपर्यंत अधूनमधून पोचले पाहिजे, तरच ते विज्ञान, नाही तर त्यांत आणि
अंधश्रद्धेत कांय फरक? मला वाटते ज्ञान या शब्दाचे व्यावहारिक रुपान्तर अज्ञानात होऊ द्यायचे की विज्ञानात करायचे हे आपणच ठरवायला हवे आणि त्याप्रमाणे धोरण आखायला हवे- तसेच त्या धोरणांत प्रसंगानुसार लवचिकता देखील असली पाहिजे.
मला आठवले की कॉलेजांत असतांना आमचा एक ग्रुप खास प्रवास करून पटना येथून मुंबईला आला होता व तुर्भे येथील अणु-ऊर्जा केंद्र आणि अप्सरा न्यूक्लिअर रिऍक्टर आम्हांला दाखवण्यांत आला होता -- का तर कॉलेज विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोण यावा हा पंतप्रधान नेहरूंचा आग्रह होता.
पुण्याजवळ खडकवासल्याला CWPRS (Central Water and Power Research Station) ही संस्था आहे -- तिथले एकेकाळचे डायरेक्टर सक्सेना यांनी मला एक किस्सा सुमारे तीस वर्षांपूर्वी सांगितला होता -- ते B.Sc. ला असतांना एका मित्राबरोबर पुण्याला फिरायला आले व CWPRS मधे पण गेले -- आम्हाला संस्था पाहू द्या अशी विनंति केली पण ती मान्य झाली नाही. मग रात्री ते आणि मित्र तारेच्या कुंपणातून शिरून आत गेले -- मात्र थोड्या वेळांतच सुरक्षा-सैनिकाने पकडले आणि सकाळी डायरेक्टरांसमोर उभे केले. ते विद्यार्थीच होते व प्रयोगशाळा पहायच्या जिद्दीने आंत शिरले होते ही खात्री पटल्यावर डायरेक्टरांनी त्यांना संस्था पहाण्याची परवानगी दिली. पुढे ते डायरेक्टर झाल्यानंतर त्यांनी महिन्यांतून एक दिवस विद्यार्थ्यां साठी खास खुला प्रवेश ठेवला होता.
मात्र हे धोरण म्हणून, जाहीरपणे , प्रत्येक संस्थेत व्हायला हवे, असे मला तेंव्हा वाटले होते. गेल्या वर्षी अमेरिकेत बर्कले युनिव्हर्सिटीत मित्राला भेटायला गेले तर तिथे सुमारे दोन-अडीचशे लहान मुलांचा गट - वय 6 ते 12 – आलेला होता आणि युनिव्हर्सिटीची कांही मुलं त्यांच्याबरोबर दिवस घालवणार होती - त्यांना प्रयोगशाळा दाखवणार होती, खेळणार होती , शिक्षण म्हणजे काय आणि कशाला या गप्पा करणार होती . आणि असे बहुतेक प्रत्येक संस्थेत होते -- भावी पिढी कशी निर्माण करतात हे ते चित्र दिसत होते. असे चित्र आपल्या देशांतही वारंवार दिसावे. तथास्तु ।
काळ पुढे जातच होता. मे महिना गेला, जून आला व
गेला, भूकंप आला नाही. बाहेरगांवी गेलेले लोक परतले, शेतकरी पेरण्यांमध्ये
गुंतला आणि आम्हीही इतर सरकारी कामांकडे वळलो. पुढे ते सेस्मोलॉजीचे यंत्र
परत दिल्लीला नेले. ते झाड मात्र बरेच दिवस बातमीत होते. लोक बघायला जात.
नाशिक पुणे हायवेवरून जाणारी कित्येक वाहने थोडी वेगळी वाट धरून ते झाड
बघून येत. मग एकदा मी पण पाहून आले आणि माझ्या पुरती या प्रकरणाची सांगता
झाली. पण त्या झाडाचा अनाकलनीय देव होऊ द्यायचा नसेल, ते झाड वैज्ञानिक दृष्टिकोणासाठीच रहायचे असेल तर ही गोष्ट पुन्हा पुन्हा सर्वांना सांगितली पाहिजे असे मला वाटते.
----------------------------------------------------------
मंगलवार, 24 अप्रैल 2012
सोमवार, 16 अप्रैल 2012
रविवार, 8 अप्रैल 2012
शुक्रवार, 6 अप्रैल 2012
घडीपत्रक-- संवादी प्रशासन ghadipatrak -- SC office
published in
बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन भूमि अभिलेख शाखा --स्मरणिका 1997
बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन भूमि अभिलेख शाखा --स्मरणिका 1997
फोल्डर्स प्रकाशित करण्या..
उद्देश
जमीन
बाबी..
अद्ययावत व अ..क
माहिती ठेवण्या..
महत्त्वपूर्ण काम
भूमी अभिलेख विभागामार्फत
केले जाते.
ब्रटीश अमदानीमध्ये
शंकु व साखळी यां..
सहाय्याने केले
जाणारे मोजणी काम त्यानंतर
प्लेन टेबलने केले जाऊ लागले.
आता दुर्बिन मोजणी
करण्यासाठी अत्याधुनिक डिजीटल
दुर्बिन यंत्र आपल्याकडे
आहे.
राज्यातील जिल्ह्या..
ठिकीणी सर्व
कार्यालयांमध्ये झेराक्स
मशीन बसविल्या असून लवकर..
त्यां..
उपयोग शासकीय
कामाशिवाय अर्जदाराना नकला
दणेसाठी करता येईल.
भूमी अभिलेखां..
संगणकोकरण करण्या..
कामही वेगाने ..लु
असून त्या..
फायदा निशि.त..
जनतेला त्यां..
कामे लवकर होण्यासाठी
होईल.
एकंदर पाहता भूमी
अभिलेख विभागामध्ये सध्या
मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर
..लु
आहे. या
वेगाने घडणार्या बदलां..
व आधुनिक तंत्रा..
माहिती खात्यातील
सर्वाना असणे अगत्या..
आहे.
जमाबंदी
आयुक्त,
पुणे
कार्यालयातून आपले कार्यालयांना
सू..ना,
माहिती
देण्यासाठी वेळोवेळी पारिपत्रके
काढली जातात.
यापुढे
अशी परिपत्रके या फेल्डर..
स्वरुपात
आपल्याकडे पो..विण्या..
मानस
आहे.
फोल्डर
मध्ये दरमहा येणार्या माहितीमुळे
आपल्याला प्रशिक्षण मिळून
आपल्या दैनंदिन कार्यालयीन
कामा..
कार्यक्षमता
वीढावी हा महत्त्वा..
उद्देश
या फोल्डर प्रकाशना..
मागे
आहे.“
त्यामुळे विलंब
टाळा कार्यक्षम व्हा .”
हे
ब्रिदवाक्य म्हणून फोल्डरसाठी
निवडण्यात आले आहे.
या
बोधवाक्यामुळे आपले स्वतः..
कार्यक्षमतेमध्ये
वाढ या अपेक्षेसह हा प्रथम
अंक प्रकाशीत करण्यात येत
आहे.
आपापल्या
कार्यालयांना विलंब टाळण्यासाठी
व जनतेला सहकार्य देण्यासाठी
आपण काय काय करता त्या..
नोंद
वरिष्ठांमार्फत आम..कडे
पाठवावी .
परिपत्रक
आम..
असे निदर्शनास आले
आहे की,
कर्यालयीन प्रमुख,
नियंत्रण अधिकारी,
विबाग प्रमुख यांनी
त्यां..
अधिनस्थ कार्यालयावर
नियंत्रण ठेवणेसाठी कोणतीही
प्रभावी पद्धत प्र..लीत
नाही.
सर्व कार्यालयांनमध्ये
विविध बाबींसाठी वेगवेगळ्या
नोंद वह्या ठेवाण्यात आलेल्या
आहेत.
परंतु सदर नोंदवह्यां..
तपासणी दरमहा
कार्यालय प्रमुख यां..कडून
केली जात नाही.
तसे..
नियंत्रण अधिकारी
व विभाग प्रमुख यांना त्यां..
अधिनस्थ अधिकीर्यांनी
सदर..
तपासणी केल्या..
समजण्यासाठी कोणतीही
पद्धत सध्या प्र..लीत
नाही.
त्यामुळे अधिनस्थ
कर्यालयाकडून महत्वा..
संदर्भामध्ये
झालेल्या कार्यवाही..
माहिती नियंत्रण
अधिकरी येंना तपासता येऊ शकत
नाही.
सर्व अधिकार्यां..
स्वतः..
कामा..
कार्यक्षमता वाढावी
व त्यां..
अधिनस्थ कामावर
सुयोग्य नियंत्रण रहावे तसे..
त्यांनी तपासणी
केलेल्या बाबीं..
त्यां..
वरिष्ठांना सुलभतेने
दखल घेता यावी,
या दुहेरी उद्देशाने
प्रतेक अधिकार्या..
काम थोडेफार वेगळे
असल्याने प्रतेका..
नियंत्रण नोंदवही
थोडीफार वेगळी असेल.
प्रतेक अधिकार्याने
त्या..
कामा..
दृष्टीने इतर सहकारी
व वरिष्ठ अधिकारी यां..शी
.. करून
आपआपल्या नियंत्रण नोंदवही..
नमुना ठरवावा.
तालुका निरीक्षक
भूमी अभिलेख यां..
नियंत्रन नोंदवहीमध्ये
त्यां..
कार्यालयातील इतर
सर्व नोंदवह्यां..
नोंद करावी.
वरिष्ठ अधिकारी
यांनी त्या..
नियंत्रन नोंदवहीमध्ये
त्यां..
अधिनस्थ असलेल्या
कार्यालय प्रमुख यां..
नियंत्रण नोंदवह्यां..
नोंद घ्यावी.
नमुन्यासाठी जमाबंदी
उपयुक्त (स.सा)
पुणे यां..
नियंत्रन नोंदवही
या सोबत दिली आहे.
मात्र का.
अ.
इ.
४ यां..
नियंत्रण नोंदवहीमध्ये
लोकआयुक्त संदर्भ,
विधान सभा प्रश्न,
शासनाकडे सादर
केलेल्या प्रस्तवां..
नोंदवही इ.
नावे आहेत.
यावरून ज.उ.आ.
आणि का.अ.
यां..
नियंत्रण नोंदवहीमधील
वेगळेपणा समजून येईल.
आपल्या कार्यालयातील
सर्व नोंदवह्यां..
दरमहा ज्या त्या
अधिकार्याने स्वतः..
सोईने वेळे..
वेळी तपासणी करावी
असे अपेक्षीत आहे.
सदरहू नोंदवह्या
तपासताना साप्ताहिक गोषवारे
काढले आहेत काय ?
शिल्लकी प्रकरणां..
तपशील कालावधी
नुसार दिला आहे काय ?
शिल्लक संदर्भा..
अनुक्रमांक नमुद
केले आहेत काय ?
संदर्भ निकाली
करताना कामा..
तीव्रता,
महत्व,
कालावधी लक्षात
घेऊन योग्य प्रकारे निकाली
केले आहेत काय ?
इत्यादी गोष्टीं..
खात्री करावी.
अशा प्रकारे तपासलेल्या
नोंदवहीबाबत नियंत्रण नोंदवहीत
योग्य तो शेरा ठेवावा.
( नमुना पाहा )
रविवार, 1 अप्रैल 2012
आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम
आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम
प्रशासकीय सेवेतून निवृत्तिनंतर सध्या माझे कार्यक्षेत्र बंगलोर आहे, पण मधून मधून मला मुंबईची ड्यूटी दिली जाते. त्या काळांत माझे वास्तव्य हैद्राबाद इस्टेट येथे पाहुणी या नात्याने असते.
हैद्राबाद इस्टेट -- केंद्र शासनाचे मुंबईतील अति वरिष्ठ अधिकारी इथे रहातात. त्यांचा दर्जा राज्यशासनाचे सचिव किंवा प्रधान सचिव एवढा वरिष्ठ असतो. शिक्षणक्षेत्रातील एक पडझड त्यांच्याही लक्षांत येत असेल. दिवसेन दिवस ही पडझड जास्तच समस्यामूलक होत चालली आहे हे ही त्यांना उमगत असेलच.
आणि खरं सांगायचं तर माझ्याही सेवेच्या काळांत ही पडझड मला दिसतच होती, आणि माझ्यासारख्या इतर कित्येक वरिष्ठ अधिका-यांना देखील.
पण ही समस्या लहानपणी पाठ केलेल्या हम्प्टी-डम्प्टीच्या कवितेसारखी आहे. भिंतीवर बसलेला हम्प्टी-डम्प्टी खाली पडून फुटतो आणि त्यानंतर -- ऑल दि किंग्ज हॉर्सेस अँण्ड ऑल दि किंग्ज मेन कुड नॉट पुट हम्प्टी-डम्प्टी बॅक अगेन. तीच अवस्था याही समस्येची होतांना दिसते.
हैद्राबाद इस्टेट -नेपियन सी रोड -- मुंबईतील उच्चभ्रू वस्तीची जागा. घरांना सर्व्हंट क्वार्टर आहेत आणि प्रत्येक क्वार्टरमधे सर्व्हंट रहात आहेत. पण हे काही सरकारी वर्ग चारचे कर्मचारी नाहीत, तर ते आहेत साधे सुधे डोमेस्टिक सर्व्हंट । नवरा बायको मिळून महिन्याची कमाई फारतर आठ-दहा हजार रुपये. प्रत्येकाची किमान दोन मुलं -- शाळेत जाण्याच्या वयांतली -- प्रसंगी केजीची.
तर मी ज्या घरांत पाहुणी उतरते तिथेही सर्व्हंट बाई आहे, तिची दोन मुले क्रमाने सहावी व पाचवीत जातात. इंग्रजी माध्यमाची शाळा, प्रत्येक मुलाची वार्षिक फी पंधरा हजार रुपये. पण शाळेची बस कम्पल्सरी -- बसभाडेही पंधरा हजार. आईवडील कमी शिकलेले - इंग्रजी न येणारे । शाळेत शिकवलेले मुलांना समजत नाही म्हणून ट्यूशन लावलेली -- तिथेही प्रत्येकी दरमहा पाचशे रुपये -- म्हणजे वर्षाचा खर्च बारा हजार.
रिझल्ट काय म्हणून विचारता ? परिक्षेत नापास होण्याची भिती आहे का -- मुळीच नाही. त्या बाईने मला प्रश्न विचारला -- ताई, टीचर सांगतात मुलांना काही येत नाही, फेल होतील, मग शाळेतून काढून टाकू. पण ताई, नियमाप्रमाणे आठवी पर्यंत मुलांना फेल करता येत नाही ना ! मग ते शिक्षक फेल कसं करू शकतील माझ्या मुलांना ? म्हणजे त्यांची धमकी पोकळच आहे ना?
पण हे तिने तात्पुरत्या समाधानासाठी शोधलेले उत्तर आहे. एरवी तिची कायम काळजी हीच आहे की एवढा उरस्फोड होईपर्यंत खर्च आणि तरीही मुलांच्या पदरांत कांहीच पडत नाहीये. मग ती वारंवार आम्हाला विचारते ताई, सांगा ना, काय करू ?
पहिल्या दिवशी मी तिला सांगितले -- मुलांना इंग्रजी शाळेतून काढ -- मराठी शाळेत घाल. निदान त्यांना विषय तरी कळायला लागेल. हे सांगतांना माझी जीभ चाचरत होती आणि तिनेही प्रश्न विचारलाच -- ताई, तुमच्या मुलांना तुम्ही इंग्रजी शाळेत घातलं आणि आता ती फॉरेन मधे आहेत. इंग्रजी नसेल तर माझी मुलं श्रीमंत कशी होणार ?
सुदैवाने माझी आई तिथेच होती म्हणून मला तिची साक्ष काढता आली. मी बाईला म्हटले -- माझे तीन मुद्दे नीट ऐक. पहिला -- मी स्वतः इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नाही गेले आणि तरी मी एवढी वरची नोकरी मिळवलीच ना -- कारण मला विषय येत होते. दुसरा मुद्दा -- माझ्या मुलांना घरी सर्व अभ्यास मराठीतून करायची सवय लावलेली होती. त्यासाठी दरवर्षी सर्व विषयांचे सर्व पुस्तकांचे दोन सेट आमच्या घरी आणत होतो. मुलांना ट्यूशन नव्हती कारण घरातील मोठी माणसे शिकवू शकत होती. हाँ, त्यांना उत्तरं लिहितांना इंग्लिशमधे लिहायचा सराव ठेवला होता. तिसरा मुद्दा -- इंग्लिश आले तरच श्रीमंती येते असं कुठे आहे
मग तिने मराठी शाळांबाबत तिचा मुद्दा मांडला. नेपियन-सी रोडच्या आसपास मराठी शाळा नाही -- कुठेतरी लांब जावे लागेल -- त्यांची बस-सर्व्हिसही नसते. मुख्य म्हणजे तिथेही िशिकवत नाहीतच --तिथेही वेगळी ट्यूशन लावावीच लागणार. नेपियन-सी रोड या भागांत चांगली मराठी ट्यूशन मिळू शकत नाही. आता बोला.
मग मी तिला माझ्या परीने तोडगा सांगितला -- सर्व पुस्तकांचा मराठी सेट आण. मुलांना ती पुस्तकं मोठ्याने वाचून काढायची सवय लाव.आणि हे ही लौकर कर. जसंजसं मुलं वरच्वा वर्गांत जातात तसेतसे त्या त्या विषयाचे पारिभाषिक शब्द वाढत जातात त्यामुळे उशीर केलास तर मराठीतूनही विषय समजणार नाही.
हे तिला काही केल्या पटले नाही. पुस्तकांचा वेगळा खर्च डोक्यावर बसेल हे कारण आधी सांगितल -- मी तो खर्च देउ केला तशी म्हणाली की नको - मुलांना एवढे वाचन पेलणार नाही आणि वेळ तरी कुठे मिळणार आहे
पण खरे कारण बहुधा हेच होते कि मराठीचा स्पर्श देखिल मुलांना न व्हावा -- तरच त्यांचे श्रीमंत होण्याचे काही चान्सेस आहेत.
या वातावरणांत आपली पुढची पिढी काय आणि कसं शिकणार आहे हा प्रश्न मला छळत रहातो.
------------------------------------------------------------------------------------------------
छान लेख आहे, आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.
हा लेख प्रसारित करायची माझी खूप इच्छा आहे. पण लहान तोंडी मोठा घास म्हणून एक प्रश्न विचारायचा होता.
सोशल मिडीयावर खोडसाळ कमेंट करणारे, आणि लोकांची दिशाभूल करणारे अनेक आहेत, तर ते लोक तुमच्या मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आणि तुम्ही मराठी माध्यमाबद्दल लिहित आहात, असे म्हणून विषयाची हवा काढू शकतात.
त्या लेखात, अजून एक वाक्य जोडाल का? कि इंग्रजी माध्यमात मुलांना तुम्ही का शिकवले?
माझ्या मते तुमची नोकरी फिरतीची असल्याने तुम्ही ते केले असावे, आणि साहजिक आहे अशा केसमध्ये इच्छा असून देखील आपल्या मुलांना आपण मराठी माध्यमात शिकवू शकत नाही..
पण हेच तुम्ही त्या लेखात टाकले तर अजून छान होईल...
- सुचिकांत
Monday 9:53am
माझी बदलीची नोकरी त्यांत केंद्र सरकारव प्रसंगी इतर राज्यामधेही जायला लागू शकत होत -- हा विचार मनात होताच. घराजवळची शाळाच जास्त चांगली म्हणून मुंबईतील कॉलनामधील मराठी शिशुवर्गात सुरुवात केली. पुण्याला अभिनव मराठी मीडीयमला घातले. धाकट्याचा शिशुवर्गही मराठीच होता. पुढे इंग्रजी माध्यमात टाकले पण चौथीची स्कॉलरशिप परिक्षेची सर्व तयारी मराठीतून करून मराठीतूनच परीक्षा दिल्या -- हेतू हा कि मराठी यावे -- घरचा अभ्यास सगळा मराठीतूनच आणि गणित तर हमखास. हिंदीपण माझ्याइतकेच नाही तरी तोडीचे असावे म्हणून हिंदीचेही भरपूर वाचन. आता माझा नातू अमेरिकेत आहे. तो घरी मराठी हिंदी नेपाली व शाळेत मॅण्डरीन मधे बोलते. येणारे पाहुणे इंग्रजी बोलतातच -- ते त्याने स्वतः शिकले. इतक्या भाषांमुळे मुलांचा गोंधळ होतो ही थियरी खूप चूक आहे, असे आमच्या उदाहरणावरून सांगता येईल.
मला तर हेच कारण वाटत होते .. पण तुम्ही याच कारणाने मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले हे मी आत्मविश्वासाने सांगू शकत नव्हतो ना ..
होय म्हणूनच एवढे विस्ताराने सांगितले
सदस्यता लें
संदेश (Atom)