शासकीय कार्यालयातील संगणक-प्रणाली
लोकसत्ता दिनांक ४.७.९६
गेली दहा वर्षे माझ्या शासकीय कामकाजातील एक महत्वाची उपलब्धी म्हणजे कार्यालयात संगणकाचा वापर सुरू करून देणे व कार्यालयात संगणक संस्कृती आणणे हा होता. कार्यालये बदललो, पश्च्िाम महाराष्ट्र विकास महामंडळ, त्यानंतर यशदा, त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक व त्यानंतर जमावंदी आयुक्त अशा प्रत्येक कार्यालयात संगणक प्रणाली उभारताना जी पद्धत मी वापरली, तो इतर कित्येक सरकारी व खाजगी कार्यालय प्रमुखांना उपयोगी पडू शकेल. पण त्याहून महत्वाचे म्हणजे ज्या कम्रचाल्यांना किंवा अधिका-यांना संगणकाची भीती वाटते त्यांची भीती दूर होऊ शकेल.
गेल्या दहा वर्षात संगणक बाजारात अशा तन्हेने बदल होत आहेत की त्यामुळे कार्यालयात संगणकाची सुरूवात करणे हे अधिकाधिक सोपे होऊ लागले आहे. याचे कारण बाजारात उपलब्ध होऊ लागलेले उत्तमोत्तम प्रोग्रॅम सॉफ्टवेयर. पूर्वी आपण कपडे शिवायला टाकत असू त्या काळात एक मोठी प्रक्रिया होती. शिंपी ठरवावा मग त्याला विचारावे की किती कापड लागणार आहे. स्टाईल ठरवावी, कापड आणावे, माप द्यावे, मग शिंप्याने कच्ची शिलाई करून ट्रायल ध्यावी, मग ती पक्की करावी, तेव्हा कुठे आपण शर्ट घालणार. दहा वर्षीपूर्वी कार्यालयात संगणक आणणे हे साधारण याच पद्धतीचे होते.
मग कापडाच्या राज्यात दोन सुधारणा झाल्या, रेडिमेड कपडयांचा जमाना आला. तुम्ही फक्त शर्टचा कॉलर नंबर लक्षात ठेवायचा आणि त्या नंबरचा रेडिमेड शर्ट आणून वापरायचा.
मग त्याहून सोपे झाले. बॅगीचा जमाना आला. कॉलरच्या मापाची किंवा खांद्याच्या मापची गरज अरली नाही. ढिलेढाले बिनमापाचे कपडे, कोणताही कपडा आणावा, कुणीही घालावा. हे जितके सोपे तितकेच सोपे आता संगणक आणणे व वापरणे हेही झालेले आहे. पण तरीही थोडे मार्गदर्शन लागतेच. म्हणून हा लेखन प्रपंच चार-पाच मुद्यांवर।
कोणता संगणक ध्यावा, त्याची किंमत कशी असते, संगणकामध्ये हार्डवेटर आणि सॉफ्टवेअर या भानगडी काय असतात, कार्यालयात आपल्याला कशा प्रकारचे सॉफ्टवेअर लागणार आहे, ते नेमके कसे वापरायचे? इत्यादी काही महत्वाचे प्रश्न आहेत. याची उत्ते आणि समज कार्यालय प्रमुखला असणे आवश्यक आहे.
कोणता संगणक या प्रश्नावर खोलात न जाता असे म्हणता येईल की, सर्व ते-हेच्या कार्यालयांसाठी सध्या ४८६ संगणक हाच उत्तम आहे. त्याच्या मास्टर चिपचा नंबर ८०४८६ असा असतो. त्या चिपला ३३ किंवा ६६ मेगाहर्टझूचा प्रोसेसर स्पीट व ८ ते ३२ एम बी रॅम मेमरी असावी. त्याला ६०० एमबी ते २ जीवीपर्यंत हार्ड-डिस्क, सुपर व्हिजीए कलर मॉनिटर, 1 उंदीर नावाचे छोटेसे उपकरण तसेच १.४४ व १.२ एमबी असे दोन्ही फ्लॉपी ड्राईव्ह असलेला संगणक रूपये ४५,००० च्या आसपास मिळू शकता. या किमतीदेखील दिवसोदिवस कमी होत असून सहा महिन्यांपूर्वी याचीच किंमत सहज ६०,००० रूपयेपर्यत मागितली गेली असती तर २ वर्षापूर्वी ही सव्वालाखच्या जवळपास होती. या सोवतचा प्रिंटर २०-२५ हजार रूपयांपर्यत वसतो. या सोबत डॉस व वर्डस्टार ही दोन साफ्टवेअरपण दिली जातात. त्याची किंमत धरूनच हल्ली संगणकाची किंमत सांगितली जाते. मात्र आपण विक्रेत्याकडून तशी खात्री करून ध्यावी.
यावरूनच संगणकाच्या जडवस्तू प्रणालीचा म्हणजेच हार्डवेअरचा अंदाज येऊ शकतो. हार्डवेअर म्हणजे 1 की-बोर्ड, 1 मॉनिटर, 1 प्रिंटर, 1 उंदीर, 1 यूपीएस(बीज गेल्या आपोआप बॅटरीतून बीजपुरवठा करणारे यंत्र) व एक पत्र्याचा खोका (कॅबिनेट) ज्याच्यात २ फ्लॉपी ड्राईव्ह, 1 हार्ड-डिस्क, 1 पॅरलल व सिरीज पोर्ट आणि मास्टर चिप (किंवा सीपीयू) असतात. प्रोसेसिंग स्पीड आणि रॅम मेमरी हे सीपीयूचे वैशिष्टय असते. संगणकाचा सीपीयू म्हणजे त्याचा मेंदू. आपल्याकडून आदेश घेणे, त्याचा अर्थ समजून त्याबरहुकूम काम पूर्ण करणं व ते काम झाल्याचा संकेत मॉनिटरवर देणे, हे काम सीपीयूमधील चिप करत
असते.
हार्ड-डिस्क आणि फ्लॉपी-डिस्क म्हणजे आपली माहिती साठवून ठेवण्यासाठी संगणकाकडे असलेली जागा! १.२ एमबीच्या फ्लॉपीमध्ये आपण साधारण एका दोनशे पानी पुस्तकाइतकी माहिती साठवून ठेवू शकतो, तर ५०० एमबी हार्डडिस्कमध्ये किती माहिती राहील बघा! इतर कोणते हार्डवेटर नेमके काय काम करते हे त्याच्या नावावरूनच लक्षात येते. तरीही अगदी नवख्या माणसाने संगणक घेताना विके्रत्यांकडून चित्रातून किंवा प्रत्यक्ष संगणकापुढे उभे राहून यातील प्रत्येक अवयव कुठे आहे ते समजावून ध्यावे.
खरेदीत लक्षात ठेवण्याचा अजून एक मुद्दा असा की पूर्वी विक्रेता ऍडव्हान्स मागत असे आता. मात्र फर्म- ऑर्डर, डिलिव्हरीअइन्स्टॉलेशन,
दोन दिवस स्टाफ ट्रेनिंग, ७ दिवस ट्रायल त्यानंतर ९०ऽ अदायगी व उरलेली १०ऽ अदायगी महिन्यानंतर (सरकारी नियमानुसार) या अर्टीवर सर्रास संगणक विकत मिळतो. मात्र यासाठी शब्द पाळण्याची परंपरा सरकारी खत्यांनी निर्माण करायला हवी. दहा दिवसांनी अदायगी करू असे एकदा कबूल केल्यानंतर सरकारी कार्यालयामध्ये जेव्हा दहा दिवसांनी अदायगी करू असे एकदा कबूल केल्यानंतर सरकारी कार्यालयामध्ये जेव्हा दहा दिवसांनंतर बिल करणारा कलार्क कुठे आहे. असा शोध घेण्यास सुरूवात होते, तेव्हा विक्रेत्याला ते परवडत नाही.
सॉफ्टवेअर विकत घेताना एक काळजी ध्यावी लागते. काही सॉफ्टवेअरला कुलूप असते. ही कुलुपे स्थूल उपकारणाच्या स्वरूपात असतात, तर काहीं सॉफ्टवेअरमध्येच असतात. ते व्यवस्थित बसले आहे व चालते चाही खात्री करून ध्यावी ज्या सॉफ्टवेअरला कुलूप नसते ते कुठूनही कुठेही कॉपी करता येते. पण आपण जेव्हा त्याची प्रमाणित कॉपी विकत घेणार असू तेव्हा त्याच्या इन्स्टॉलेशन डिस्क आठवणीने घेऊन वापरून खात्री करून ध्यावी. तसेच त्यांची छापील पुस्तके व रजिस्ट्रेशन नंबरही आग्रहाने मागून ध्यावे.
संगणकाचा वापर करताना आपल्याला ज्या सॉफ्टवेअरची गरज पडते त्याचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. यांना सुटसुटीत मराठी शब्दसुद्धा मी वापरून पाहिले आहेत. ते आहेत आदेश प्रणाली, संगणक भाषा, गद्य प्रणाली व इतर संगणकीय कार्यक्रम, त्यामध्ये सरकारी कार्यालयांसाठी आलेखन कार्यक्रम (म्हणजे चार्ट, सारण्या व ग्राफ आखून त्यात माहिती तयार करणारे कार्यक्रम) महत्वाचे आहेत. याशिवाय चित्रांकन कार्यक्रम, गणिती कार्यक्रम असतातच. त्यांची चर्चा इथे करत नाही. मात्र संगणकीय कार्यक्रम हा शब्द अगदी अक्षरशः कार्याचा क्रम या अर्थाने ध्यावयाचा असतो, त्यामुळे कार्यक्रमाचे सॉफ्टवेटर वापरताना एका ठराविक क्रमानेच संगणकाला कामाचे आदेश द्योवे लागतात व तो क्रम समजून ध्यावा लागतो.
आदेश-प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डॉस, विंडोज्, जिस्ट या तीन प्रणाली महत्वाच्या आहेत. एखादा मुलगा भूमितीचा अभ्यास करायला बसला तर त्याला पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, रबर, पाटी, कंपास, पट्टी असे सर्व साहित्य आधी जुळवावे लागते. हेच काम ऑपरेटिंग सिस्टीम त्या संगणकासाठी करत असते.
दुसरा प्रकार म्हणजे लॅग्वेज किंवा संगणकाची भाषा असा बेसिक, फोर्ट्रान, सी इत्यादीसारख्या संगणकाच्या भाषा आहेत. आपल्या वापरातल्या भाषा-मराठी,
इंग्रजी या अर्थाने संगणक भाषा म्हणजे काय व त्याचा वापर करून संगणकीय कार्यक्रम कसे तयार करतात हा थोडा कठीण विषय आहे. परंतु, आता खूप चांगले रेडिमेड कार्यक्रम (प्रोग्रॅम) तयार झाले असल्याने सरकारी कार्यालयांतून भाषांचे सॉफ्टवेटर विकत घेण्याची आणि शिकण्याची गरज नाही. आठ-दहा वर्षापूर्वी इतके कार्यक्रम तयार नव्हते. तेव्हा मात्र प्रत्येक कार्यालयात एखादी संगणक भाषा वापरून आधी आपल्या गरजेचा एखादा प्रोग्रॅम बनवून ध्यावा लागत होता व मगच त्यावर ऑफिसच्या फाईलची माहिती भरणे शक्य होत होते. त्यामुळे ट्रेनिंग कठीण जात होते. आताच्या ट्रेनिंगमध्ये संगणक भाषा व त्यावरून कार्यक्रम करण्याची पद्धत शिकवावी लागत नसून फक्त रेडिमेड कार्यक्रम कसे वापरावे एवढे ट्रेनिंग द्यावे लागणार आहे व ते खूप सोपे आहे. थोडक्यात व्याकरणाचे कोणतेही नियम माहीत नसूनही. एखाद्या मुलाने चांगला निबंध किंवा कविता लिहावी, तसेच कोणतीही संगणक भाषा न शिकता कार्यक्रमाचे सॉफ्टवेटर वापरता येते.
एकूण आता नेमके कोणते सॉफ्टवेअर स्टाफने शिकणे गरजेचे आहे? याचे उत्तर,
(अ) डॉस, विन्डोज्, जिस्ट या आदेश-प्रणाली
(आ) वर्ड स्टार, अक्षर, शब्दरल, राईट यासारख्या गद्यप्रणाली
(इ) सारणीबद्ध माहिती तयार करण्यासाठी, व त्या अनुषंगाने ग्राफ किंवा बार चार्ट इत्यादी करण्यासाठी फॉक्स, लौटस, एस.पी.एस.एस. किंवा एक्सेलसारखे कार्यक्रम.
या सर्व प्रणाली ज्यांनी मूळ संशोधन करून बाजारात आणल्या आहेत, त्या त्या कंपन्या या प्रणालींच्या सुधारित आवृत्यां काढत असतात. उदा. सध्या बाजारात 'डॉस- ६.२२''विन्डो-१५' किंवा विन्डोज्- ३.११ अशा आवृत्या आहेत.
आता संगणकाचे बटन दाबून तो सुरू केला की काय होते ते पाहू! प्रत्येक संगणकाच्या चिपवर एक अत्यंत छोटा आदेश लिहिलेला असतो. त्यामुळे सुरू केल्याबरोबर संगणक स्वतःला थोडेसे सावरून बसतो व आपल्याला सांगतो की, आता पुढचे आदेश तुम्ही द्या. या प्रकाराला 'बुटींग' असे म्हणतात.
अशा वेळी डॉस किंवा विंडोज या आदेश प्रणालीचा वापर करून आपण विशिष्ट काम संगणकाला सांगू शकतो. उदा. प्रिंट काढ एखादी माहिती फ्लॉपीवर कॉपी करून दे 'हार्ड डिस्कमध्ये माझ्या सोयीप्रमाणे कप्पे पाड''तुझ्याकडे आतापर्यत तयार असलेल्या एकूण फाईलींची यादी दाखव'इत्यादि. मात्र या प्रणालीमध्ये फक्त इंग्लिश भाषा चालते. उलट जिस्ट ही ख-या अर्थाने आदेश प्रणाली नाही, आपण तिल आंशिक प्रणाली म्हणू. ती केंद्र शासनाच्या पुणे येथील सी-डॅक या संस्थेने भारतीय भाषांचा संगणकावर डॉसच्या जोडीने चटकन वापर करता यावा म्हणून खास तयार केलेली प्रणाली आहे, पण ही प्रणाली हवे तेव्हा रोमन व हवे तेव्हा देवनागरी लिपी वापरण्यासाठी उपयोगी पडते. हार्ड डिस्कवर जिस्ट प्रणाली टाकून ठेवली की आपल्याला नुसते एक बटन दाबून देवनागरी ते रोमन अशी अक्षरे बदलता येतात. मात्र जिस्टच्या आदेश प्रणालीची किंमत दहा हजाराच्या आसपास असून तिला कुलूप बंद करण्याची सोय आहे. त्यामुळे एका संगणकावरचे जिस्ट दुस्त्यावर कॉपी करून घेता येत नाही. तेच डॉस किंवा विंडो कॉपी करता येतात आणि त्याची किंमत ४ ते ५ हजार एवढीच आहे. संगणकाला एकाचं वेळी डॉसच्या जोडीने जिस्टचे आदेश पण स्वीकारता येतात. तसेच जर विंडोज व डॉस या दोन्ही प्रणाली हार्ड डिस्कवर असतील तर आपल्याला एकाच वेळी दोघांची मदत पण घेता येते, पण हा विस्ताराने शिण्याचा भाग झाला, विंडो ही आदेश प्रणाली खूप नवीन व खूप सोयीनिंयुक्त अशी आहे, पण डॉस ही आदेश प्रणाली संगणकाबरोबर फुकटच मिळते. सरकारी कार्यालयासाठी डॉस, विंडो व जिस्ट या तिन्ही प्रणाली संगणकावर असाव्यात, डॉस व विंडोच्या क्षमतेचा अंदाज आपल्याला अशावरून लावता येईल की डॉससाठी सीपीयूला अर्धा एमबी नैंम मेमरी पुरते तर विंडोज ३.११ साठी किमान ४ एमबी रैंम मेमरी लागते. विंडोजच्या जोडीला जिस्ट वापरता येता नाही म्हणून आयएसएम नावाची सुधारित प्रणाली काढली आहे. यामुळे जुजबी इंग्लिश येत असल्यास नव्वद टक्के काम मराठीत होऊ शकते.
गद्य प्रणालीचे सॉफ्टवेटर (याना 'वर्ड प्रोसेसिंग'
म्हणतात.) सरकारी कार्यालयामध्ये खूप उपयोगी पडते. सध्या मोठया प्रमाणात वापरली जाणारी गद्य प्रणाली म्हणजे वर्डस्टर. डॉस आदेश प्रणालीला ही चालते. मराठीत शब्दरत्न, किंवा अक्षर यासारख्या गद्य प्रणाली उपलब्ध आहेत. तेच विंडोज् या आदेश प्रणालीत राईट नावाची गद्य प्रणाली आहे व आता त्यांनी खूप जास्त सोयी असलेली वर्ड परफेक्ट नावाची गद्य प्रणाली काढली आहे. विंडोमध्ये श्री नावाची मराठी गद्य प्रणाली चालते. जिस्टचा वापर करून एएलपी नावाची मराठी-इंग्लिश मद्य प्रणाली वापरता येते, तर आयएसएम चा उपयोग विंडोजवर गद्य प्रणालीसारखा करता येतो. अशा नव्या गद्य-प्रणाली सतत तयार होत असतात.
गद्य प्रणालीचा वापर पत्रव्यवहार मसुदे तयार करण्यासाठी होतो, संगणकाचा स्क्रीन हा जणू पाटी पेन्सिलीने लिहिल्यासारखा असतो. दुरूस्ती असेल तेवढयापुरते पुसून दुरूस्त मजकूर लिहायचा. यामुळे प्रत्येक दुरूस्त मजकूर पुन्हा पहिल्यापासून टाईप करण्याचा टंकलेखकाचा त्रास वाचतो. शिवाय त्याच पत्राची प्रत तीन महिन्यांनंतर लागत असेल तर त्याही वेळी फक्त संगणकामधली जुनी फाईल प्रिंट ध्यायची तसेच
गद्य रचनेतील परिच्छेदाचा क्रम बदलणे, हवी ती अक्षरे लहान मोठी, साधी तिरकी छापणे, हव्या त्या ओळींना
अक्षराचे वळण बदलणे असले टंकयंत्रावर न जमणारे प्रकार यात करता येतात. त्यामुळे पत्राचे सौदर्यपण वाढते.
या ठिकाण मराठी टंकलेखन शिकवणा-या संस्थांना सूचना द्यावीशी वाटते की त्यांना संगणकावर जिस्ट प्रणाली वापरून मराठी टंकलेखन शिकवावे याचे कारण आहे. एरव्हीच्या मराठी टंकलेखन यंत्राचा की-बोर्ड आणि जिस्ट प्रणालीचा की-बोर्ड आणि जिस्ट प्रणालीचा की-बोर्ड वेगवेगळे आहेत. ज्याला साधे मराठी टंकलेखन येते त्याला जिस्टचा की-बोर्ड हातात बसायला दहा बारा दिवस लागतात. पण इथून पुढच्या काळात सगळीकडे जिस्टसारख्याच की-बोर्डची गरज पडणार.
आलेखन प्रणालींचा वापर तत्ता किंवा ताळेबंद तयार करण्यासाठी होतो. यासाठी पाच-सात वर्षापूर्वी लोटस किंवा डी-बेस हे सॉफ्टवेटर वापरत, परंतु फॉक्स प्लस सॉफ्टवेटर हे त्यापेक्षा उत्तम तर एम.एस.ऑफिसमधील एक्सेल हे त्यापेक्षा उत्तम सॉफ्टवेटर आहे, कार्यालयीन माहितीचे नेमके विश्लेषण करण्यासाठी हे कार्यक्रम अत्यंत उपयोगी आहे. पेन्शन केसेसचे उदाहरण घेऊ या समजा मी अनुक्रमांक, कर्मचा-याचे नाव, सध्याचे पद, जिल्हा, नोकरीला लागल्याचा दिनांक, सेवानिवृत होण्याचा दिनांक, विभागीय चौकशी सुरू आहे अगर नाही, वेतनश्रेणी, बसणारे पेन्शन, एजीकडे पाठवल्याची तारीख एवढे कॉलम पाडून दोनशे कर्मचा-यांची माहिती संगणकात भरली तर त्यावरून नंतेर मला खालीलप्रमाणे विश्लेषण करता येऊ शकेल.
१) जिन्हावार आकडे काढणे २) ......... निवृत्त होणा-यांची यादी वेगळी तयार करण, ३) विभागीय चौकशी अंतर्गत प्रकरणेत्ती वेगळी यादी. ४) किती केसेस एजीकडे गेल्य व किती शिल्लक राहिल्या इत्यादी.
थोडक्यात संगणकावार सारणीमध्ये माहिती भरली की त्यातून उलट सुलट माहिती चटकन मिळवता येते. ही माहिती देण्यासाठी संगणकाला दोन मिनिटे पुरतात. दोनशे वीस हजार केसेसची माहिती संगणकाकडे असली तरीही पाच मिनिटांत विश्लेषणात्मक माहिती आपल्याला मिळू शकते.
नाशिक विभागीय आयुक्त व जगावदी आयुक्त या कार्यालयात आम्ही संगणकावर फॉक्स-प्लस या कार्यक्रमांतर्गत एक फाईल उद्यडून त्यात येणारे सर्व टपाल नोंद..... सुरूवात केली. सर्व करकारी कार्यालयांत प्रत्येक पत्र चार वेळा नोंदवले जाते. एकदा मुख्य टपाल कर्मचान्याकडे,
मग प्रत्यक्ष केस हाताळणा-या लिपिकाच्या वर्कशीटला,...नंतर पेन्शन, तक्रार इत्यादी वर्गवादी असेल ...... त्या रजिस्टरला व कदाचित पुन्हा एकदा अवट रिजस्टरला. संगणकावर हे टपाल नोंदयल्यावर दोन प्रती काढून एक मुख्य आवक कलार्ककडे व एक वर्कशीट कलार्ककडे देऊन भागते वर्गवारीसाठी संगणकाला योग्य सूचना...... की पुन्हा कोणालाही हाताने रजिस्टरल ....... काढावे लागत नाही. संगणकच अल्प केळत वर्गवारीप्रमाणे प्रकारणाची यादी करून देतो,त्यांमुळे कारकुनी कामातला दोन तृती...... वेळ वाचवता येतो.
याच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ............
पुरवठासंबंधात सर्व माहिती व ...... जिल्ह्यात भूमी संपादनाविषयी सर्व ........ फॉक्स प्लस या सॉफ्टवेअरचा वापर करून संगणकात तक्तयांच्या स्वरूपात तयार केलेली आहे व त्याचा मासिक विश्लेषणासाठी उपयोग केला जातो. यामुळे कार्यालयातील कामात निश्च्िातच वेळ वाचतो हे दिसून आले आहे हे फक्त उदाहरण झाले. जमाबंदी आयुक्त कार्यालयात केंद्र शासनाच्या मदतीने सूंपण लैंड रेकॉर्डचे संगणकीकरण करण्याचे काम शुरू आहे. त्यामुळे जमीन उता-याच्या नकला देणाचे काम तर सोपे होईलच शिवाय कधीही गावची किंवा तालुक्याची तेरीज, अत्यल्प- अल्प भूधारक तसेच लहान- मोठया शेतक-यांच्या वेकळ्या याद्या इत्यादी कित्येक त-हेचे विश्लेषण करता येईल.
प्रत्येक सरकारी कार्यालयाची कार्यक्षमता संगणकामुळे वाढू शकते. मात्र त्यासाठी कार्यालय प्रमुखाची किंवा स्टाफपैकी किमान तीन- चारजणांची चिकाटी तरी हवीच. कित्येक कार्यालयांमधून संगणकाचा वापर पगार बिलासाठी, बैंकिंग व्यवहाराच्या नोंदीसाठी, कॅशबुक व अकौंटिंगसाठी, बाजारभावाची छाननी करण्यासाठी इत्यादी विविध प्रकारे केला जातो. मात्र कर्मचान्यांचे प्रशिक्षण हा एरव्ही दुर्लक्षिलेला मुद्दा योग्य
प्रत्यत्नांनी लक्षात घेऊन योग्य प्रयत्न करून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठीदेखील
कार्यालय प्रमुखाची स्वतःची कार्यक्षमता व इच्छाशक्ती आवश्यक ठरते.
ट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठट्ठ
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें