मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

सोमवार, 22 जुलाई 2013

नोकरशाहीतील संन्यासी महाराष्ट्र टाईम्स

नोकरशाहीतील संन्यासी

महाराष्ट्र टाईम्स
नोकरशाहीतील संन्यासी
महाराष्ट्र टाईम्स

मॅनेजमेंट टेक्नीक्स वर पाश्चात्य देशांत जेवढी म्हणून प्रथितयश पुस्तक आहेत त्यांच्यात एक समान धागा आहे- महत्वाकांक्षेबाबतचा. कोणत्याही उद्योगांत किंवा व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर माणसाने महत्वाकांक्षी असले पाहिजे. हाच गुरूमंत्र त्या देशातील प्रशासनिक अधिका-यांना देखील दिल जातो. सहाजिकच आपल्या देशांतही सर्व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स मधे हेच तत्व शिकवले जाते. शेल्या दहा पंधरा वर्षात प्रत्येक राज्यांत ज्या प्रशासनिक ट्रेनिंग साठी अकॅडमी स्थापन झाल्या आहेत आणी जिथे मॅनेजमेंट या विषयावर खूप भर दिला जात आहे तिथेही हाच धागा मुख्य असतो. तरीही भारतभर अजून कित्येक असे अधिकारी दिसून येतात ज्यांचे काम उत्कृष्ट आहे, सचोटी संशयातीत आहे, जनसामान्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना जाण आणी संवेदनशीलता आहे, पण ते महत्वकांक्षी नाहीत. त्यांचे काम हाच त्यांचा ड्रायव्हिंग फोर्स. काम चांगले झाले पाहिजे हीच त्यांची निष्ठा पण चांगले काम केले म्हूणून किंवा चांगले काम करून दासवण्यासाठी अमुक पोस्टिंग छा असाही त्यांचा आग्रह नसतो. असेल त्या पोस्टिंग मधे त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसतो पण तो ठसा जास्त ठळक दिसाना म्हणून अमुक पोस्टिंग छा असा आग्रह त्यांनी केलेल नाही हे ही उघड जाणवते. अशांना कांय म्हणावे?
     हा प्रश्न नुकताच आमच्या एका चर्चा- मंडळात निघाला. दोन अधिकारी असतील- दोघांचे रेटिंग उत्कृष्ट- म्हणजे कार्यतत्परता, सचोटी,धडाडी, निर्णयक्षमता आणी जनसंवेदनशीलता या निकसांवर उत्कृष्ट असेल- पण त्यांच्यापेकी एक महत्वाकांक्षी आहे आणी दुसरा नाही- तर त्यांच्यापैकी आपला आदर्श कोण? चर्चेत असेही ळक्षांत आले की कुढल्याही पश्च्िामी देशांतील चर्चेत हा प्रश्न उद्भवणार नाही. कारण महत्वाकांक्षी नसणे हाच मुळात तिकडे दुर्गुण किंवा कमीपणा मानला जाईल. पण भारतात जी कांही नीतिमूल्य आहेत त्यात संतोष हा गुण मानला आहे- दुर्गुण नाही आणी उणीव तर नाहीच नाही. त्या नीतिमूल्यांची पठडी जपणारे आणी म्हणून संतोषी असणारे कित्येक अधिकारी भारतीय प्रशासनात आहेत. मग प्रश्न हा की ही संतोषाची प्रवृत्त्िा परंपरा चांगली की वाईट, भारतीय नोकरशाही ला प्रेरक की मारक? आपल्या देशाच्या समस्या सोडवायला रेलव्हंट की इर्रेलेव्हंट? याचे उत्तर शोधायला चर्चा घसरली ती हिंदू धर्मातील सन्यास या संकल्पनेवर.
     हिंदू फिलॉसफी मधे चार पुरूषार्थ सांगितले आहेत आणी तेही एका ठराविक क्रमाने पहिला पुरूषार्थ आहे धर्म- मग अर्थ मग काम शेवटी मोक्ष! यातील प्रत्येक पुरूचा पुरूषार्थ मागच्यांवर अधिष्ठित असला पाहिजे. अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती संपन्नता पण ती धर्माधिष्ठित असली पाहिजे- अर्थात स्वतःचे श्रम, कार्यकुशलता आणी उत्पादकता यातून निर्माण झाली पाहिजे. ती संपत्ती चोरी, दरोडेखोरी लुटालूट, कपट, जुगार, अडवणूक किंवा भ्रष्टाचार या मार्गाजी मिळवलेली नसानी, तिसरा पुरूषार्थ काम म्हणजेच स्वतःच्या योग्यनेने जी संपत्ती मिळवली तिचा योग्या उपभेग घेणे नीटनेटका विनियोग करणे. असा योग्य उपभोग वांछनीय आहे कारण त्याने जीवनात स्थैर्य, सुरक्षितता येऊन त्यातूनच कला आणी ज्ञानाचे संवर्धन किंवा जतन होऊ शकते. थोडक्यात समाजातील सृजनशीलता, कल्पकता उत्पादकता वाढवण्यासाठी आणी त्यातून समाज पुऐ नेण्यासाठी उपभेग सुद्धा आवश्यक आहे. हे तीनही पुरूषार्थ मिळवून झालेल्यानेच पुढे मोक्षाचा विचार करावा-त्यासाठी पहिला पायरी म्हणजे सन्यास.
     सन्यास ग्रहणाचा अधिकार प्रत्येकाला सहजपणे मिलत नाही. पुरूषार्थाप्रमाणेच माणसाच्या जीवनात चार आश्रम किंवा चार अवस्था सांगितल्या आहेत- ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी दश आणी ज्ञानार्जनाचा काळ. नंतर गृहस्थाश्रमात आल्यावर माणसाने आपले ज्ञान कौशल्य उत्पादकतेच्या बळावर धनार्जन करावे ते धर्म आणी नीतिच्या चौकरीत असावे. याच काळात माणसाने धनाचा उपभोग पण ध्यावा- परिवारचे सुख आणी कल्याण याकडे लक्ष घालावे, उद्योग व्यवसाय वाढवाने. हे दोन आश्रम मिळून पन्नास वर्षाचा कालावधी
सांगितला आहे. त्यानंतर मरणसाने वानप्रस्थ आश्रम ध्यावा म्हणजेच आपल्या उद्योग व्यवसायांची जबाबदारी पुढील पिढीवर टाकून त्यांना अद्योगधंधात सक्षम तरबेज करावे. आपण दैनंदिन जबाबदारी अधिकार या दोहोतून मुक्त व्हावे. कधी अडचण पडलीच तर तेवढयापुरते मदतीला यावे, एखी दुरून मार्गदर्शन करावे. मात्र दैनंदिन ढवळाढवळ करू नये. शकय झाल्यास बनाकडे प्रस्थान करावे तिथे निसर्गाच्या सान्निध्यात रहावे आपल्या गरजा कमी कमी कराव्या, ज्ञानार्जन करावे, इंद्रिय निग्रह शिकून ध्यावा. या सर्व अनुभवानंतर जर त्याला आपली योग्यता आणी सामर्थ्य आहे असे वाटले तर एखाद्या चांगल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली संन्यासाची दीक्षा ध्यावी.
     थोडक्यात ब्रह्मचर्य, गृहस्थ आणी वानप्रस्थ हे आश्रम सर्वांसाठी आहेत. सन्यास मात्र ज्याच्यात योग्यता आणी दृढनिश्चय असेल त्याच्यासाठीच आहे.
     याचे कारण असे की हिंदू धर्मात सन्यासी माणसावर मोठी जबाबदारी आकलेली आहे-ती आहे समाजातली हार्मोनी टिकवण्याची त्या पुरती लीडरशीप समाजाला देण्याची. सन्यास घेतांना माणूस आपले नांव, परिवारा बरोबरची आपली आयडेटिटि, आपली समाजातील ओळरव, सर्व कांही सोडून देतो मग तो कुणाचा बाप नाही, भाऊ नाही, आई नाही, बहिण नाही, पत्नी नाही- कुणीच नाही. याचे प्रतीक म्हणून मुंडणविधी सांगितला आहे. इथे त्याचे वैयक्तिक जीवन संपून सामाजिक जीवनाला सुरूवात होते. तो समाजाकडून न्यूनतम दानाचा स्वीकार करून समाजासाठी जगू लागतो.
     संन्याशाने भिक्षा मागून जगावे. आपण लोकांच्या भिक्षेवर मुडविलवर जगतो, त्यांच देण लागतो हे देण त्यांना योग्य दिशा दाखवून फेडायचे आहे ही जाणीव त्याने सतत ठेवावी.
     संन्याशाने फक्त पाच घरातून भिक्षा ध्यावी शिके किंवा उष्टे अन्न भिक्षेत घेऊ नये- यापायी उपाशी रहावे लागले तर रहावे. एका गांवात तीन दिवसांपेक्षा जारूत दिवस शहू नये त्याने भगवी वस्त्रे वापरावीत. त्याच्या सामानात फक्त एक कमण्डलू किंवा तूम्बा असावा- हा जंगली लाल भोपळयाचा करतात- त्याला दोन खण असतात. एका खणात वदलण्यासाठी लागणारे दुसरे वस्त्र वरच्या खणांत भिक्षेत मिळालेले अन्न किंवा पाणी- याशिवाय जास्त सामानाचा संग्रह संन्याशाने करू नये.
     भगव्या वस्त्राचे देखील कारण आहे. हिंदूच्या बहुतेक सर्व कर्मकाण्डात भगवा रंग त्याग, तपस्या, उत्सर्ग, बलिदान, वीरता, ज्ञान आणी संतोष मांचे प्रतीक मानला जातो. मानवी मनावर रंगाचा, काय परिणाम होतो याचा मानसशास्त्रीय प्रयोग अभ्यास ज्यांनी केला असेल तेच उलगडा करू शकतील कि भगव्या रंगाचा या गुणांशी संबंध कसा जोडला गेला. एवढे मात्र खरे की भारतीय संस्कृतीत भगवा रंग धारण करण्याचा अधिकार फक्त दोघांनाच आहे- एकतर ज्याने सन्यास घेतला आहे असा किंवा जो वीरमरणाला सामोरा जाण्यासाठी निघाला आहे असा. शिवाय लांबच्या तीर्थयात्रेला निथालेल्या माणसाला खांद्यावर भगवी पताका घेण्याचा अधिकार आहे. कारण भगवा रंग हा सांसारिक मोह सोडल्याचे प्रतीक असला तरी सामाजिक जबाबदारीतून दूर पळण-यांसाठी नसून समाजासाठी उत्सर्ग करण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे.
     संतोष या गुणाचे महत्व वरील पार्श्र्वभूमीवर समजून ध्यावे लागेल. समाजासाठी उत्सर्ग करायचा आसेल तो माणूस वैयक्तिक जीवनात आणी आपल्या आशा आकांक्षांच्या बाबतीत पूर्ण पणे संतोषी असला पाहिजे- ज्ञानेश्र्वरांच्या भाषेत 'सुखिया' तसेच त्याने समाजाला लीडरशिप छायची असेल तर तो स्वतः जानी हवा कार्यक्षेत्र प्रवीण हवा आणी तरीही व्रतस्थ समाधानी हवा.
     अशा संतोषी संन्यस्त माणसाला बधून कोणा ही आळशी माणसाच्या मनात विचार येऊ शकतो की मी पण अशीच भगवी वस्त्रे धारण करून भिक्षा मागत निघालो तर कांही काम करताच माझे पण पोट भरू शकते. एवढेच नाही तर कदाचित शिष्य परिवार गोळा होऊन धनसंग्रह देखील होऊ शकेल. पण केवळ भगवी वस्त्रे घेऊन एक आळशी माणूस एका ज्ञानी संन्याशाची बरोबरी करू शकत नाही.
     हाच मुद्दा कार्यक्षम पण संतोषी अधिकस्यांच्य बाबतीत पण लागू पडतो. बरेचदा काम करणारे ऍव्हरेज ऑफिसर पण त्तवचिंतकाच्या भाषेत सांगू लागतात- अरे मी तर आहे तिथेच खुश आहे- संतोषी आहे

मी जास्त काम पण करत नाही- डोक पण झिजवत नाही आणी महत्वकांक्षा पण बाळगत नाही. पण हा संतोषाचा आव त्याच्या आळसातून आणी अकार्यक्षमतेतून जन्माला आलेला असतो. त्याच्यापेक्षा एखादा कार्यक्षम पण महत्वाकांक्षी अधिकारी कुणालाही हवा हवा सा वाटेल कारण महत्वाकांक्षे पायी कां होईना- निदान तो कामे तरी उरकतो. पण त्याहून ही श्रेष्ठ अधिकारी तोच जो कार्यक्षम असूनही आपल्यातच परिपूर्ण आहे- या त्या पोस्ट मागे पळत नाही कारण त्याची कामातील उत्कृष्टता त्याच्या पोस्ट मधून मिळालेली नसून ती त्याचा सहज स्वभाव बनून गेलेली असते. याच सहज स्वभावातून चांगले काम आणी त्यातून मिळणारा आनंद हे त्याच्या संतोषाचे कारण असते.
     तस पाहिल तर उत्तम कार्यक्षमते तून कधी कधी अहंकार पण निर्माण होऊ शकतो शेवटी तोच कार्यक्षमतेला मारक पण ठरू शकतो. हा अहंकार ही एखाद्या अतृप्त महत्वाकांक्षेचेच दुसरे रूप असते. अशा अहंकाराला जवळ येऊ देता ज्याने संतोषाची अवस्था माठली तो त्या जनी संन्याशासारखा असतो. थोडक्यांत खरा संतोष समाधान हे कार्यक्षमतेतूनच मिळू शकतात. पण एखादा ऍव्हरेज अधिकारी देखील आपल्या अकार्यक्षमतेला समाधान या नावाने जस्टिफाय करू पहातो. अशा दोन अधिका-यांमधील फरक ओळखण्या ची जबाबदारी जनता, वरिष्ठ अधिकारी राज्यकर्त्यांवर येऊन पडते.
     आज भारतीय प्रशासनिक सेवेत आणी एकूण नोकरशाहीच सहा-सात प्रकारचे अधिकारी कर्मचारी आढळतात. जे कार्यकुशलही नाहीत आणी महत्वाकांक्षी पण नाहीत असे कांही, जे कार्यक्रम नाहीत किंवा
आहेत पण त्यांचे स्पष्ट उद्दिष्ट पैसा हेच असल्याने ते निश्च्िातपणे भ्रष्टाचारी आहेत असे काही आणी त्यासाठी त्यांचा विशिष्ट पोस्टिंगचा आग्रह असतोच. इतर कांही कार्यक्षम असतात- पैसा- विशेषतः गैर मार्गाने मिळालेला पैसा त्यांना नको असतो पण जास्त पर्कस्‌ असाणारे, जास्त सत्ता देणारे किंवा सत्ताकेंद्राच्या जवळ नेणारे, फॉरेन ट्रिप्स, फॉरेन असाइनमेंट्स मिळवून देणारे पोस्टिंग त्यांना हवे असते ते मिळवण्यासाठी पैसा, नतमस्तकता, काम्प्रोमाइझेस या सर्व प्रकारांन मुक्तपणे वापरण्याला त्यांचा विरोध नसतो. काही असले काम्प्रोमाइझेस करत नाहीत पण मग नैराश्य घेऊन कुढत बसतात-आपण गैरमार्ग वापरण्याच्या तत्वाला चिकटून बसलो ही चूक झाली म्हणून पश्र्त्ताप करतात आणी इतरांना पुढे येऊ द्यायचे नाही अरू ठरवून वागतात. मात्र या सगळयांच्या कळपात असेही अधिकारी आहेत जे कार्यक्षम समाधानी आहेत, इतरांचे गुण ओळखू शकतात, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात (क्विड प्रो क्वो शिवाय) त्यांच्या बरोबर एकत्रित पणे समन्वय साधून काम करू शकतात. भारतीय नोकरशाहीत जो कांही चांगलेपणा टिकून आहे तो मुख्यतः या शेवटच्या अधिका-यांमुळे
     धर्माची व्याख्याच मुळी धारयति सः धर्मः अशी केली आहे. ज्या गुणाने किंवा गुणसमुच्चयाने स्वतःला आणी समाजाला सावरण्याची, धरून ठेवण्याची, पुढे नेण्याची क्षमता निर्माण होते ते गुण म्हणजे धर्म! समाजाचे ताणतणाव वाढू देत नाही, समाजाता हार्मोनी टिकवून ठेवतात ते गुण म्हणजे धर्म! असा धर्म कार्यक्षमते शिवाय येऊ शकत नाही तसाच तो संतोषाशिवाय देखील येऊ शकत नाही. कार्यक्षम माणस्तने महत्वाकांक्षी असणे स्वाभाविक आहे. ही महत्वाकांक्षा कुठलाही अनुचित मार्ग वापरता पूर्ण होणार असेल तर गृहस्थाश्रमी माणसाला ती वांछनीय पण मानलेली आहे. म्हणूनच पश्च्िामी देशतील मॅनेजमेंट फिलॉसफीचे गुरू आणी दिग्गज आटापिटा करून सांगतात- महत्वाकांक्षी व्हा त्या महत्वाकांक्षेसाठी का होईना पण कार्यक्षम व्हा! पण महत्वाकांक्षा आणी कार्यक्षमता यांच्या पुढली पायरी आहे समाधान ज्याच्या शिवाय समाजाची हार्मोनी फार काळ टिकू शकत नाही. या साठी समाधान आणी संन्सायी वृत्ति दोघांचेही महत्व आहे- अगदी मॅनेजमेंट सारख्या विषयांत सुद्धा। इथेच भारतीय मानसिकता आणी पश्चिमी मानसिकता वेगळी आहे- तो वेगळेपणा ओळरवण, टिकवण हे आपल्या हातात आहे. अशी या चर्चाप्रकाराची सांगता झाली.

................................................................             



कोई टिप्पणी नहीं: