ऐसा अंदमान
दि. २४ डिसेंबर १९८७
दिवाळी संपल्या संपल्याच आम्ही मुंबई-मद्रास मार्गे तडक पोर्ट-ब्लेअर गाठले. या अंदमान-वारीबाबत घरी बराव खल झावा होता. मुले रोज नकाशे व पुस्तके पाहून मला भूगोलाची नवीन माहितो सांगत होतो तर वडीसधारी मंडळी या निमित्तान स्वतंत्र्यवीर सावरकरांच्या निरनिराळया आठवणींना व त्याच्य करणपणात त्यांना सावरकरांबद्दल काय वाटे त्या भावनांना उजाला देत होतो. माझ्या मनात मात्र अंदमान बाबत काय धक्कडोवी घनदाट जंगलं आणि मध्यप्रदेशांततील आदिवासी याचे संयुक्त मिश्रण केल्याने जे काही घडेल त्यात कोराल्स बाबत वाचलेले सर्व काही मिसळायचे की झाले अंदमान, या पलीकडे काही विचार केला नव्हता आणि टूरिस्ट लिटरेचर तर मुळीच वाचलेले नव्हते.
मद्रास ते पोर्ट ब्लेअरचा विमानाचा प्रवास संपूर्ण समुद्रावरुन. ढग थोडे विरळ झाले को खाली दिसावच्या समुद्राच्या लाटा - जूण काही मोठया निळया कापडावर बारीक बारीक चुण्या पडल्या असाव्यात व मधेव पांढरे शुभ तांदळाचे दाणे विखुरले असवित - या पलीकडे समुद्राची काहीच हालचाल नाही. आणि समुद्र व आकाश कुठे एक झाले याचा पत्ता त्या दोघांनाही नाही कि त्यांना लपव पाहणा-या दगांनाही नाही. तिच्या भोवती एक सोनेरी रंगाची रेघ - त्या भोवती एक पाचूच्या हिरव्या रंगाची रेघ व त्या भोवती निळया रंगाच्या फिक्या, गडद छटा. हळूहळू या सोनेरी व पाचूच्या रेघा रुंद रुंद होत गेल्या व आमचे विमान अलगद उतरले.
विमानताळावरुन बाहर आली आणि पहिले दोन धक्के बसले. जाहेर पोर्ट ब्लेअर नसून चक्क पुणे असावं किंवा मद्रास असावं असं वाटलं. छान रुंद डांबरी रस्ते, घरांची दाटीवाटी, मार्केट एरिया, शापिंग सेन्टर्स रस्त्यावरुन मोकळ्पणी हिंडणारी वाहने, चक्क स्कूटर्स चालवणा-या स्त्रिया, युनिफार्म मध्ये शाळेची मुळे अन् काय काय ? दुसरा धक्का म्हणजे सर्वजण हिंदी बोलत होती. आमचा तेलगू ड्राइव्हर कोणी बंगाली दुकानवाला अन् को तमिल शहाळीवाला ही मंडली एरवी आपापल्या प्रांतचा, आपापल्या भाषेच टोन घेऊन कसं हिंदी बोलत असतात कि त्या हिंदीवरुन आपण हा मद्रासू अन् हा मराठी ओळख शकतो पण पोर्ट ब्लेअर मधील सर्वांचे हिंदी अगदी थेट हिंदी पध्दतीचे. एरवीच्या वागण्यात देखील प्रांतीय अभिनिवेश नाही.
राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसहिष्णुतेचे खरे दर्शन इथेव घडले. दोन बंगाली माणं देखील आपापसात हिदीच बोलतील आणि यदाकदाचित बंगाली बोललीच तर तामिल माणसाला बंगाली व बंगाली माणसाला तमिल येत असते.
मनात विचार आला कुठे आपला महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद महाराष्ट्र-गोवा भाषावाद, हिंदी सिनेमा व गाण्यांविरुद्ध तमिलांचे आंदोलन तर बंगाली व बोलू शकणा-या माणसाला काहीही मदत न देण्याची कलकत्तावासियांची वृत्ती जेव्हा आपल्याला देशांतील सर्व भाषा बोलता येतात ही अभिमानाची गोष्ट असल्याचे शाळेत शिकवले जाईल तेव्हा ही एकात्मता आपल्याकडे येईल. एरवी एक भारत देश राहिला काय किंवा त्याचे तीस अगर तीनशे तुकडे झाले काय, त्याचं खरचं कोणाला सोयरसुतक आहे का ?
पोर्ट ब्लेअर हे अंदमान बेटांवरील सर्वांत मोठं शहर व राजधानीचं ठिकाण गजबजलेलं - तरीही हिरवंगार आणि निळाशारही. कारण तुम्ही कुठेही असा - समुद्राच्या अगदी जवळ असता. सर्व झाडं, फळ-फुल आपल्या इकडल्या सारखोच - खर तर आमच्या टूरिस्ट होमच्या बागेत आणि इतरही सगळीकडे जास्वंदी, गुलाबक्षी सोनटक्का, तेरडा, संकासर, अबोलो अनॅ कोरांटी पाहून माझी निराशाच झाली. एके दिवशी या आपलेपणाने कळस गाठला - एका चिखलाच्या डबक्यात काही म्हशी आरामात डुंबत होत्या नाही म्हणायला रस्त्यांवर घाण टाकायची किंवा पानाच्या पिचका-या टाकायची वृत्ती नव्हती आणि भिकारी अजिबात नव्हते.
गावांची नावं देखील अशीच - मायबंदर, रंगत, जंगलघाट, फरारगंज आणि बारा किलोमीटर हळूहळू या नावांचं काही वाटेनासं झालं. उलट आता कुठे विठ्ठलवाडी आणि च-होली बुदुक दिसतात काय याची पेज लागली. त्यातला कित्येक बेटांचे अजून नामकरण पण झालेले नाही आणि कित्येक बेटे पूर्णाणे निर्मनुष्य आहेत. उत्तरेला अंदमान व्दोप समूह व दक्षिणेला निकोबार द्वीप समूह.
येण्या-जाण्याचे साधन म्हणजे बोटी व काही महत्वाच्या मोठया बेटांवर होणा-या हेलिकॉप्टरच्या फे-या. एकदा बेटावर पोचल्यानंतर तेथे संपूर्ण शासकीय यंत्रणाराबताना दिसते त्यामुळे साहजिकच जोप्स, सायकली, स्कूटरों असे वाहन प्रकार लहान लहान व्चोपांवर पण आदळतात. मात्र या बोटी व हेलिकॉप्चर्सच्या फे-या ठरलेल्या नसून त्यात फेरबदल होत राहतात. ठरल्याप्रमाणे ट्रिप झाली असे प्रमाण ५० ते ६० टक्के. अंदमान वरुन निधालेली एक बोट लॉग साऊथ ट्रिप करुन शॉर्ट नॉर्त ट्रिप करते तर दुसरी बोट लॉग नॉर्थ करुन शॉर्ट साऊथ ट्रिप करते तर कॅम्पेल बे व वाटेवर कार निकोबार (म्हणजे छोटे निकोबार) आणि इतर बेटे. तर उत्तरेकडील टोक म्हणजे डिगलीपूर. खुद्द पोर्टब्लेआरला बोटीने मद्रास, वुशाखापट्टनम् किंवा मद्रास-पोर्टब्लेअर अशा फे-या होतात. अंदमान व निकोबारच्या मधून ९० अंशाची अंक्षांश रेषा जाते-तिथला समुद्र खडकांमुळे अतिशय धोकादायक आहे आणि म्हणून विदेशी पर्यटकांना त्याचेच आकर्षण.
अंदमानचा इतिहास आपल्याला पटकन लक्षात येणार नाही असा आहे. दोन-तीनशे वर्षांपूर्वी नक्कीच इथे लोकवस्त्या होत्या - इथले आदिवासी निग्रो-टाईप न मंगोलियन टाईप असे दोन प्रकारचे आहेत. १७५७ साली ब्रिटिशानी प्लासीची लढाई जिंकून भारतात प्रवेश मिळवला. तेव्हाच त्यांनी या बेटांवरही कब्जे केले. इथल्या आदिवासीत मात्र ते मिसळते नाहीत. भारतातील विरोधकांना ते अंदमानवर आणून सोडत. ही संस्था जेव्हा बाढली तेव्हा ब्रिटिशांनी इथे सेल्यूलर जेल म्हणजे एकेका कैद्यापुरती एक खोली असलेला तुरुंग बांधला. या तुरुंगात मध्यभागी ऑफिस व त्याच्या ७ बाजूला तीन मजली बांधलेल्या खोल्यांची भली मोठी रांग आहे. ते केदी थोडी फार शेती भाजीपाला इत्यादि करु लागले. अशा त-हेने भारताच्या सर्व भागातील जनतेची वस्ती इथे हळूहळू सुरु झालू तरी ब्रिटिशांच्या दृष्टीने ते सर्व केदीच होते व त्यांना भारतात जायला परवानगी नव्हती. दुस-या महायुद्धा जपान्यांनी इथेताबा मिळवला व १९४१ मधे सुभाषचंद्र बोस पण येथे सेनानी म्हणून येऊन गेले. मात्र जपान्यांनी या लोकांना फार वाईट वागवले. मग ते केदेतील असीत अगर बाहेर राहणार असीत. आता या केदखान्याने नॅशनल स्मारक झाले आहे. एक छोटा भाग इथली लोकल जेल म्हणून वापरतात.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने खास प्रयत्न करुन विभिन्न प्रांताच्या लोकांना व फाळणीतील विस्थापितांना इथे वसवले. या सर्वांना सेटलर्स असे म्हणतात. आता अंदमानला जाऊ इच्छिणारी व अंदमानवरच ज्यांची रोजी रोटी अवलंबन आहे अशी मोठी पिढी निर्माण झाली आहे. यात मजुरांपासून तर पंचतारांकित हॉटेल्स व विदेशी पर्यटकापर्यन्त सगळयाचा नंबर लागतो. त्यामुळे आता इथे देखील प्री-सेटलमेंट, सेटलमेंट व पोस्ट सेटलमेंट असे वादाचे विषय झाले आहेत - नोकरीतील राखीव जागेवरुन वाढ तर जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या हक्काबाबत सुध्दा वाद आहेत. नव्याने बाहेरुन येणा-यांनी एपतीप्रमाणे मोठमोठया जमिनी विकत घेण्यावे सत्र वालू केले आहे. त्याला साहजिकच जुन्यांचा विरोध आहे. कारण मुळात जमीनच फार कमी आहे.
या जमिनीच्या बाबत सरकारची व्दिधा मनस्थिती आहे. मुळात अंदमान निकोबार व्दीप म्हणजे समुद्रात खोल खोल बुडालेल्या एखाद्या डोंगराचे शिखार असीव असा अंदाज आहे. त्यावर खूप झाडी आहे म्हणून थोंडोफार माती तयार झाली. त्यामुळे थोडी फार शेती होऊ शकते - पण शेती म्हंटली की जंगते तोडून टाकणे भाग आहे. ते केले तर माती वाहून जाणार. अशा परिस्थितीत जंगलतोड न होऊ देण्याबद्दल काय करावे 1 जमिनीवर मालकी हक्क कितपत यावेत व कुठे थांबवावेत 1 तीच व्दीधा मनस्थिती पर्यटनाबाबतची - जास्त पर्यटक आले तर जास्त उत्पन्न मिळेत पण त्यांच्यासाठी जास्त साधन सामग्री लागेल. तिचे उत्पादन बेटावरच करायचे असेल तर शेती वाढवाची लागेल - औद्योगिकरण वाढवावे लागेल - ( आज विटांपासून सर्व मेनलैडवरुन आणावे लागते) याचा भार पर्यावरणाला झेपेल का१ त्यावप तोडगा निघाला की अंदमान हे फक्त अतिश्रीमंत ल पर्यटकणांसाठीच मर्यादित असावे. आता त्या दृष्टीने पाहणी व आखगी सुर आहे. पण अतिश्रीमंत म्हणजे विदेशी किंवा अनिवासी भारतीय पर्यटक. त्यांनी हेरगिरी केली तर काय 1 याचे उत्तर सध्या कुणाजवळ नाही.
आणि याहून मोठो व्दिधा मनस्थिती तिथल्या आदिवासींबाबत आहे. अंदमानात नर भक्षी व माणसाळलेल्या अशा मिळून चाळीस पन्नास आदिवासी जाती. आहेत. ज्यांच्यावर सांस्कृतिक जीवनाचा प्रभाव आहे - जे कपडे घालतात शाळा शिकतात - नोकरी करतात किंवा घरे बांधून राहतात अशा जाती फारच कमी. या आदिवासी जातीतील लोकसंख्या किती असावी 1 कुणाची दोन-तीन हजार तर कुणाची अगदी बावीस. यांना शिकवून आपल्यासारख करायचं तर त्यांची आयडेंटिटी जाते - तसचं सोडायचं तर साधनांअभावी तियांचा निर्वशं होत हे उधड दिसते काही जमातींना अजून आग देखील नाहित नाही. अशा परिस्थितीत त्यांना टिकवण्यासाठी, वाटवण्यासाठी प्रयत्न फार अपुरे पडतात असे वाटले.
१७५७ मधे इंग्रज अंदमान आले. त्यांनी अंदमानच्या श्जारीच रॉस आयलंड बेटावर आपले मुख्य ठिकाण ठेवले होते. रॉस आयलंडवर ब्रिटिशांचा कमिशनर रहात असे. त्याच्यासाठी व्दीपीच्या सर्वांच उचं जागेवर घर बाधलेले होते. थोडे व उतरुन खाली आल्यावर ऑफिस होते. बॉलरुम होती. हॉस्पिटल, स्मशान भूमि व बाजार होते - बेकरी होती - आइस फॅक्टरी होती फायरिंग रेंज होती स्पिनिंग पूल होता - बॉयलर हाऊस आणि प्रिंटिग प्रेस होती. चर्च तर होतेच.
या सर्वांवर जपान्यांनी १९३१ मधे ताबा मिळवला व १९४२ पर्यन्त ते तिथे होते. पुनः परभवानंतर जाताना त्यांनी या सर्वांची तोड फोड केली. पोर्ट ब्लेअर वर बांधलेली जपानी बंकर्स व रॉस आयलंड वरील केलेली मोडतोड एवढयाच त्यांच्या वास्तव्याच्या खुणा. आता या सर्व इमारतींना झाडांक्या मुळयांनी वेढले आहे. त्याचे पुनरुज्जीवन शक्य नाही. पर्यटकांसीठी तेवढेच एक ठिकाण झाले असे म्हणत पोर्ट ब्लेअर वरुन सकाळी एक बोट प्रवासी फेरी मारते. शहाळयांच्या वहातुकीसाठी मात्र छोटया बोटी चालू असतात.
शहाळी हे अंदमानचे मुख्य पीक. जोडीला सुपारी, केळी, मध, पपये, मिरी दालचिनी ही इकडे होणारी भरघीस पीके. अगदी थोडया प्रमाणात भात शेती अन् मासे भरपूर. पण पिकते त्याच्या विक्रिची सोय नाही. विशेषताः लांबच्या बेटांवर ज्या बोटो जातात त्यांच्या डोळयांत अक्षरशः पाणी येते.
शेती हा मुख्य व्यवसाय नाहीच. मुख्य व्यवसाय म्हणजे सरकारी नोकरी करणे मग तो शिक्षकाची नोकरी असो - कम्युनिटी वर्करची असो अगर हत्तीवाल्या माहुताची असो. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन हे इथले सर्वात मोठे कॉर्पोरेशन. जंगली लाकडे हे सरकारी उत्यन्नावे मोठे साधन. सरकारी क्षेत्रातली अशिया खंडतली सर्वात मोठी सॉईंग मिल इधे आहे. आपल्या सागवानी लाकडाप्रमाणे तिथले लाल रंगाचे लाकडू पडाक प्रसिद्ध आहे. वनखात्याचा दुसरा मोठा उद्योग म्हण्जे ऑईल पामची मोठी लागवड करुन त्यापासून पाम तेल काढणे. मात्र
प्रत्येक धोरण ठरते ते दिल्लीहून आणि प्रत्येक आदेशसाठी वाट पहानी लागते दिल्लीची कारण अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश आहे.
पाम फळांचे उत्पादन जंगी व तेल फॅक्टरी वादवायची परवानगी आलेली नसल्याने तेल उत्पादन कमी असे चित्र पहायला मिळाले. तिथले वनखात्याचे अधिकारी त्यामुळे थोडे खट्टू होते. पण मेनलॅडनर देखील असंच होत असते - परिस्थिती बिघडते - सावरते - हे चक्र चालच राहणार अशी आम्हीच त्यांची समजूत घातली.
---------------
अंदमानला जाऊन कोराल्स तर बघायलाच पाहिजेत. यासाठी जॉली बॉय बेटावर जायला हवे. एक दोड तासाचा कोटीचा प्रवास करुन आम्ही त्या निर्मनुष्य बेटाच्या किना-यावर पीहीचली. बेटाच्या आतजायला परवानगी नाही आणि तेही खरेच. कारण आत होती पतत घनदाट झाडी. किना-आला लागूनच समुद्राच्या आत अगदी चार फुटावरच त-हेत-हेच्या आकाराचे व रंगाचे कोराल्स पहायला मिळाते. एरवी खोल पाण्यात कोराल्स खूप असतील पण ते सामान्च माणूस कसा पाहणार 1 समुद्राचे नांव रत्नावर सार्थकरणारा तो देखावा होता. रात्री हे प्रवाल जास्त प्रकाशन होतात व हालवाली पण करतात म्हणे. हेच मृत झाले की आपण त्यांची सजावट म्हणून वापरतो कित्येक पर्यटक जीवंत कोराल्स, मोठाले जीवंत शिपले गोला करुन जलसृष्टीचा वाश करत असतात. याबाबतीत आता हळूहळू कडक कायदे करताहेत.
आणखीन एकदा बोटीवरुन फेरफटका मारत असताना एक डॉलफिन आमच्या बोटीच्या पुढे आले. चांगला पंधरा वीस मिनटं बोटीबरोबर रेस लावून पोहत होता. त्यातच कोलांटया उडया मारणे, उंच उडी मारणे, एका बाजूने खाली शिरुन दुसरीकडून बाहेर येणे असे प्रकार करुन दाखवत होता. शेवटी तो परत गेला तेव्हा खूप वेळ डॉलफिनच्या बुद्धीची चर्चा चालू राहिती. तर फरारगमजला जाऊन आम्ही हत्तीच्या मदतीने मोठमोठे ओंडके कसे उचलतात ते पाहून आली. एक जाडणूक ओंडका मोठया मेहतीने ढक्लत टक्लत ट्रक वर वढवून झाल्यावप हत्तीने बराच वेळ बाश्शहुशश केले तेव्हा कुठे आम्हाला त्याच्या मेहनतीची खरी कल्पना आली.
अंदमान दहा महिने पावसाळा. नोव्हेंबर त्यातल्या त्यात बरा असे आमच्या तिथला मित्रांनी सांगितले. सर्व बाजूंनी समुद्र. त्यामुळे उत्तर-दक्षिण पूर्व-पश्च्िाम कुठूनही वादळाने यावे आणि कधीही पाऊस. पहावा. समुद्राच्या तर तर ढगांची सतत रेलचेल असते. अचानक त्यातून पाऊस सुरु होतो ते दृश्य अवर्णनीय असते. पावसाची धार जणू काही दिसते. असेच एका दुपारी समुद्रावरुन हेलिकॉप्चरने जात असताना पाऊस चालू होता अन् डोक्यावर सूर्य आला तर चक्क समुद्रावर पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसले. ते पाहून आम्ही धक्कच झाली. तीच नमुना ब्रदर आयलंड आणि सिस्टर आयलंडवा. पोर्टब्लेअरवरुन हटस् बे कडे हेलिकॉप्टरने जाताना वक्क शनी ग्रह व त्याची रिंग दिसाची तसेच सिस्टर आयलंड व त्याच्या भोनती सोनेरी वलय दिसत होते. हा सोनेरी रंग आतल्या वाळूमुळे दिसतो. अंदमानवर वाळू खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे ते काही छोटया छोटया रुंदीचे बीचेस आहेत तिवून वाळू चोरण्याचे प्रमाण जोरदार असते. ही माहितो ऐकली नि आपल्या कडील वर्तमानपत्रांमधे उन्हाळयात हमखास दिल्या जाणा-या वाळू चोरीच्या बातम्या आठवून आम्ही मनसोक्त हसलो.
-----------------------------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें