मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 20 जुलाई 2013

मी कशी शिकले आणि शिकवले complete

मी कशी शिकले आणि शिकवले complete 
मैत्रीच्या पलीकडे
........श्रीमती लीना मेहेंदले

प्रत्येकाच्या शिकण्याची स्वतःची अशी स्टाईल किंवा पध्दत असते, इतराच्या पध्दती समजून घेऊन आपल्या पध्दतीत थोडा फार बदल करता येतो तो महत्वाचा ठरू शकतो. विशेषतः इतरांना मार्गदेर्शन करताना, उदाए शिक्षक किंवा पालकांना।
   
मला शिकविण्यात माझे आजोबा , आई वडील याचा मोठा वाटा होता. आजोबा उठसूठ तोंडी गणित विचारत असत. त्यामधे मिश्किलीपण असायची. मी खूप लहान असताना त्यांनी मोठया माणसांच्या घोळक्यात विचारलं होतं. एका पेरूला एक आणा खर्च तर पाच पेरूंना किती ? (उत्तर : पाच आणे) पुढचा प्रश्न, गच्चीत एक रूमाल वाळवायला एक मिनिट लागते, तर पाच रूमाल वाळवायला किती ? मी 'पाच मिनिटे' हे उत्तर देण्याचीच सर्व मंडळी जणू वाट पहात होती. या गुगलीतून मी सुदैवाने बचावले, पण लगेच आजोबांनी मला काम - काळ - वेगाचा मुद्दा पण समाजवून दिला. त्यांची आणि माझ्याची आईची चढाओढ असायची की. माझ्या वयाला झेपतील अशी सोपी पण काही तरी युक्ती असलेली गणितं मला घालांवी, आई स्वयंपाक करताना माझे पाढे म्हणून घयायची ती सरल साही नव्वे किती ? नऊ त्रिक किती ? या पध्दतीने, आता आमच्या घरात खालीनप्रमाणे घरांचे सात चौकोन काढले आहेत.


x

x
x
 x 
x
x
x
x
x


दोन ते नऊ या पाढयातले ६३ गुणाकार ( ज््र ४) वगळून त्यावर मांडले आहेत. आठ ते पंधरा वर्षापर्यंत सर्वांना त्याचे उलट-सुलट पद्धतीने पारायण करावे लागते - मग ती माझी मुळं असोत, भाचरे असोत, शिवाय दुस-या सात चौकानांमध्ये ११ ते १९ पाढयांपैकी ६३ गुणाकार लिहून ठेवले आहेत. पाढे पाठ कशासाठी करावेत ? यावर माझे उत्तर असे की, त्याने गणित पटापट तरता येऊन आत्मविश्र्वास गणितावर प्रेम वाढते - गणिताच्या गंमतीजमती कळत्या की, बुद्धीची झेप प्रचंड वाढते. ही अनुभव मी कित्येकांच्या बाबतीत घेतला आहे. गणिताची कोडी घालण्यात माझ्या आजोबांचा हातखंडा होता. पण संमोरच्या मुलाच्या बुद्धीला झेपेल अशी सुरुवात करुन ते हळूहळू कठीण गणिताकडे जात. पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांना वाटल्यास घरी मराठीतून पाढे पाठ करायला लावावेत. ते लौकर लक्षात राहतात.

मी सर्वप्रथम वाचायला शिकले ते लोकसत्ता मधील '' हे अक्षर रोज सकाळी वर्तमानपत्रावरच्या पहिल्या पानावरचे सगळे शोधायचे. हळूहळू इतर अक्षरे, मग लिहिणं. मोठेपणी घरकाम करायला येणा-या प्रौढ निरक्षरांना शिकविण्यासाठी मी खूपदा ही पद्धत वापरली.

शाळेत शुद्धलेखनासाठी आमच्या बाईंनी फक्त एक नियम घातला होता - अक्षर सरळ काढायचं सर्व उभ्या आणि आडव्या रेघा सरळ असल्या पाहिजेल. मग ते आपोआप सुंदर दिसतं आणि पेपर वाचताना बाईना त्रास
होत नाही. मोठेपणी माझ्या भावाचं आणि मुलांचं अक्षर सुधारुन घेण्यासाठी मी हीच पद्धत वापरली त्याचा त्यांना खूप फायदा झाला.

माझ्या मते, कविता ठेक्यात म्हणता येणं हे फार आवश्यक आहेकारण त्या लयीतून जो आनंद मिळतो त्याने इतर अभ्यासाचं ओझं जाणवत नाही. लयीत म्हटलेली उपयोग करता येतो. अगदी लहानपणीच मावशीने श्री शंकराचार्यांचे चर्पटपंजरिका ाोत पाठ करुन घेतले होते. त्यातील घेण्याची गोडी लागली. कविता शिकणे, त्यातील शब्दयोजनेवर खल करणे अशा चांगल्या सवयी त्यामुळेच लागल्या. कवितेमुळे फक्त आपले शब्दभांडार वाढते, एवढेच नाही तर शब्दांचा मार्मिकतेने उपयोग कसा करावा हे ही कळते, माझ्या मुलाच्या दहावीच्या वर्गात एका कवितेच्या ओळी अशा होत्या -
                   असे विश्र्वकर्मा श्रमांचा पुजारी
                   जिथे राबती हात तेथे हरी

यातला विश्र्वकर्मा म्हणजे विष्णूच, पण कल्पना अशी आहे की, तो इंजिनियर होता आणि स्वतःच्या हाताने घडवून, राबून त्याने ही सृष्टी निर्माण केली, मुलांना शिकविताना मी म्हटलं - आता हीच ओळ एक वेगळा शब्द वापरुन कशी वाटते ते सांगा -

'असे शेषशायी श्रमांचा पुजारी' त्याबरोबर सगळी हसत सुटी. झापलेला किंवा झोपाळू शेषशायी श्रमांचा पुजारी कसा ?

कविताबरोबर व्याकरण हाही माझ्या आवडीचा विषय होता. हिंदी मराठी भाषेमध्ये बहुव्रीही समास हा एक प्रकार असतो - त्या शब्दाचा शब्दार्थ वेगळआ, पण साकेतिक किंवा गूढ अर्थ वेगळा - या कल्पनेने मी इतकी मुग्ध झाले होते की असे पाचएकशे शब्द गोळा करुन ठेवले होते.

नववी - दहावीपर्यंत माझ्या असं लक्षात आलं होतं की, अभ्यासातल्या काही गोष्टी आपत्याला खूप आनंददायी असू शकतात. त्या शोधून त्यांच्याबाबत सखोल अभ्यास केला तर खूप फायदा होतो. कारण त्या गोष्टी आपल्या मिळालेलं ते एखादं जादी इंद्रियच. माझे काही आवडले धडे होते. घ्ठ्ठद्धठ्ठडथ्ड्ढ दृढ द्यण्ड्ढ क्रदृदृड्ड च्ठ्ठथ््रठ्ठद्धत्द्यठ्ठ किंवा ऋडद्व एड्ढद ऋड्डड्ढथ््र. यांचे 'रसग्रहण' मी माझ्या भाषेत चार-पाच वेळा तरी लिहून काढले असेल. एकदा लिहील्यावर महिन्या-दोन महिन्यांनी वाटायचे, की आपण मागच्यापेक्षा चांगलं लिहू शकतो. किंवा देशाचा भूगोल शिकायचा तर आपले मोठे डोंगर (हिमालय, अरावली, विंध्य, सातपुडा, सह्याद्री, नीलगीरी) आणि मोठया नद्या - ब्रह्मापुत्रा, गंगा-यमुना, सिंधूसह पंजाबच्या पाच नद्या, महानदी, चंबल, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा या महत्तवाच्या नद्या लक्षात ठेवल्या की झाले. कुठलेही राज्य, त्यातली जमीन, तिथली पिकं, तिथले लोक, सगळे काही कोणता डोंगर आणि कोणता नदी त्यावरुन लक्षात ठेवता येतं. असाच फायदा अक्षांश-रेखांश लक्षात ठेवूनही होतो. शाळेनंतर खूप वर्षांनी आय.ए.एस. च्या परीक्षेसाठी युरोपीय इतिहास हा विषय शिकताना मला अक्षांश-रेखांशावरुन नकाशे आणि त्यावरुन युद्धभूमी, युद्ध का झालं वगैरे वगैरे शिकायला खूप उपयोग झाला. शिवाय आकाशाच्या अक्षांश-रेशांशाची कल्पना नीट समजल्यामुळे खगोलशास्त्र  शिकण्यात इतकी मदत झाली की, आज मी आकाशातली, कोणत्याही महिन्यात, कुठेही दिसणारी मोठी चांदणी ओळखू शकते.

शाळेत आठवी-नववीत असतानाच ही सवय लावून घ्यावी. आपण स्वतःचे असे काही हुकमी धडे किंवा प्रश्न नीट तयार करुन ठेवायते, मॉडेल उत्तर म्हणून नव्हे, तर आपल्याला ठळक अक्षरात लिहून घराच्या दारांवर
किंवा भिंतीवर कागद चिकटवून ठेवायची मला सवय होती. तसेच निबंध लिहून संग्रह करण्याची, इतरांचे त्याच विषयाचे निबंध वाचायची हौस होती. त्यामुळे एकच विषय वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसा हाताळावा, हे समजत होते.

शिवाय वाचनाचा खूप नाद होता. गोष्टींची खूप खूप पुस्तके वाचली. अगदी संपूर्ण रामायण, महाभारत, उपनिषदं, शांकरभाष्य यासारखे गहन, तात्विक चिंतनाचे विषय ते जेबी जासूस (हिंदी), काळा पहाड, पेरी मेसन, चंद्रकांतासारख्या गुप्तहेरी कादंब-या  ! एकीकडे क्रांतिकारकांचे किस्से तर दुसरीकडे विज्ञानातले आविष्कार ! त्यामुळे बहुश्रुतपणा आला. आमची प्राथमिक शाळा (जबळपूर, मध्यप्रदेश) ही नगरपालिकेची शाळा होती. तिथले मुख्य शिक्षक निरनिरालळे प्रयोग करीत असत. त्यांनी पहिली-दुसरीसाठी शिक्षक ठेवले नव्हते. चौथी पाचवीचे निवडक हुषार विद्यार्थी आळपाळीने त्या छोटया वर्गांना शिकवीत. त्यामुळे आमच्यामधे शिकवण्याची होतोटी निर्माण झाली. तसेच आमचा अभ्यास एकदम पक्का झाला. कित्येकदा एखादे शिक्षक पण तिथे येऊन बसत आमच्या शिकविण्यात चूक झाली असेल तर सांगत.

आपल्या समजलेला विषय आपल्या भाषेत मी लिहून काढत असे. त्याचप्रमाणे परीक्षेची तयारी म्हणून त्या विषयावर किती मार्कांचा, कोणता प्रश्र विचारला जाऊ शकतो - तितकी मोठी २/३ वेगवेगळी उत्तरं पण मा तयार करुन ठेवत असे. परीक्षेच्या तंत्रात यशस्वी व्हायचे असेल, आणि विषय पण कळायला हवा, तर दोन्ही बाजूंनी अभ्यास करायला हवा. खूप जण फक्त पुस्तक वाचून विषय नीट समजावून घेऊ शकतात. ही पद्धत पण वाईट नाही - मात्र त्यात विचार करणे किंवा मनन या प्रक्रियेसाठी खूप वेळ दिला पाहिजे. कित्येकदा मुलं भाराभार टयूशन्स लावतात. पण स्वाध्याय म्हणज एकटयाने स्वतःच्या मनाला वाटेल आणि जमेल तसा थोडासा तरी अभ्यास रोज केलाच पाहिजे. त्याशिवाय असतील त्या आधीच आपल्याला त्या धडयातला जमेल तेवढा भाग समजून घेता आला, तर त्याचा खूप उपयोग होतो. ही पद्धत मी अगदी एम.एस्सी. पर्यंत वापरली.

विषय पक्का होण्यासाठी शाळेत नेमून दिलेल्या पुस्तकापेक्षा अवांतर वाचणेही गरजेचे असते. दुर्दैवाने आपल्याकडे मराठी-हिंदी भाषेत अवांतर वाचनासाठी चांगली पुस्तके लिहिली जात नाहीत इंग्लिश सगळ्यांचे चांगले असत नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी अजून खूप पुस्तके मराठी-हिंदीत लिहिली गेली पाहिजेत. अभ्यासाची माझी एक अजून खूप पुस्तके मराठी-हिंदीत लिहिली गेली पाहिजेत.

अभ्यासाची माझी एक अजून वेगळी पद्धत होती. बंद खोलीत अभ्यास करण्यापेक्षा मोकळ्या बागेत, अंगणात, गच्चीवर असा माझा अभ्यास जास्त चांगला होत असे. याउलट नसे रेडियओ, टीं.व्ही. इत्यादींसमोर मला कधीच अभ्यास पाटी-पेन्सिलवर किंवा खडू-फळ्यावर होई. हॉस्टेलमधे पण माझ्याकडे पाटी असायची आणि इतर मुलींना माझी पद्धत आवडून त्या मागून न्यायच्या.

माझी अभ्यासाची आवडती वेळ म्हणजे दुपारी दोन ते चार आणि रात्री नऊ ते अकरा. एरवी नुस्ता हुंदडगा. मात्र एखादा धडा आपल्याला पक्का करुन धयायचा आहेसं ठरलं की, तो होईपर्यंत दिवसाला सात-आठ ताससुद्धा त्यातच जात असत. एकाग्रचित्तता हा गुण मला इतका चांगला लाभला होता की त्या काळात घरात इतर काय चाललंय हे मला कळतही नसे. अशी एकाग्रता येण्यासाठी लहानपणी शिकलेल्या तीन गोष्ट उपयोगी - सकाळी पंधरा मिनिटे आसनं, सायंकाळी पंधरा मिनिटे घरात सामूहिक प्रार्थंना रात्री दहा मिनिटे ध्यान. यात पूर्वी थोडे आता नेहमीच खंड पडतात. तरी त्यांचा झालेला परिणाम उपयोग टिकून आहेत.


माझे वडील अभ्यासासाठी वेगळी पद्धत वापरत, ते अनुक्रमणिका प्रस्तावना पण वाचून घेत. शिवाय रोज सकाळी थोडा वेळ समोर बसवून पुस्तक वाचून घेत. यामुळे पूर्ण पूस्तकात कुठे काय धडा आहे, हे लाक्षात येत असे. तसे प्रस्तावना वाचल्याने लेखकाच्या मनातला उद्देश, आपल्या वाच्ण्याच्या पद्धतीबद्दल त्याची अपेक्षा हेही समजत असे. पुढे कळले की, पाश्चात्य लेखकांच्या पुस्तकात मोठी प्रस्तावना असते ती किती उपयोगी असते.

एम. एस्सी. साठी दोन वर्षे हॉस्टेलमध्ये असतांना अभ्यासाच्या दोन चांगल्या सवयी लागल्या. एक म्हणजे सायंकाळी साडेसहा ते साडेआठ नियमित एकाग्र अभ्यास. दुसरे म्हणजे घोलक्यात बसून एकत्र केलेला अभ्यास. जसा इतरांना शिकवून आपला अभ्यास पक्का होतो, तसेच घोलक्यात बसून चर्चा करुन एखाद्या विषयाची तयारी केली तर तीही पक्की होते.


अभ्यासातला आनंद, सात्तय, एकाग्रता, स्वाध्याय, नियमितपणा, पूरक वाचन, मनन या सर्व गुणांना अभ्यासात खूप महत्तव आहे ! त्याचप्रमाणे निरुपण - म्हणजे विषय समाजावून सांगे - तो इतर लहानग्यांना असेत नाहीतर मित्रमंडळीतल्या चर्चेत सांगितलेला असेल ! शिक्षणात अभ्यासाबरोबरच खेल, संगीत, नृत्य, व्यायाम यांसरख्या विषयांची खूप मदत होते. तसेच चित्रकला, कविता करणे, नाटक-व-ृत्व इत्यादी निर्मितीचे गुण असणे यांनीही अभ्यास उठावदार होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी या बाबी पण जोपासल्या पाहिजेत.





कोई टिप्पणी नहीं: