मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 15 नवंबर 2016

5 वादळाचा पाठलाग- दै लोकमत 13/12/99

13/12/99
वादळाचा पाठलाग

बातमी:-
ओरिसा राज्यात भयानक चक्रीवादळ. पारादीप बंदर संपूर्णपणे नष्ट. सुमारे बारा जिव्हे वादळग्रस्त. मालमत्तेचे प्रचंड नुकसान. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील. बहुधा या शतकातले हे सर्वात मोठे वादळ.

प्रतिक्रिया (महाराष्ट्र):-
पुनः एकदा लातूर भूकंपांची आठवण व्हावी अस भयानक वादळ आल आहे ओरिसात. हो, पण दोन प्रकारांनी ही घटना वेगळी आहे. लातूर भूकंपाचे भौगोलिक क्षेत्र अगदी मर्यादित होते- वीस पंचवीस गांव एवढेच. इथे सुमारे बारा जिल्हे क्षतिग्रस्त झालेत. ही वाव परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिने जास्त गैरसोयीची आहे. जागोजागी मोठमोठी झाड उन्मळून पडल्याने रस्ता अडले आहेत. त्यामुळे मदत पोचवण्यांत मोठी अडचण आहे. त्यातल्या त्या एक वर आहे- प्रत्येक गांवात जीवितहानी हा प्रकार झालेला नाही. कांही ठराविक गांवातच तसे झाले आहे.

या चक्रीवादळाने झालेले नुकसान
वेगवेगळ्या प्रकाराने झाले. कांही ठिकाणी दुर्दम्य वेगाचे वारे आले. सुमारे ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर हा वेग! डेक्कन क्वीन पिंपरी ते तळेगांव या पह्यांत सर्वाधिक म्हणजे ताशी शंभर कि.मी. हा वेग सुमारे पंधरा मिनिटांसाठी गाठते. त्यावेळी दारांत उभे राहून या वेगाचा अनुभव घेता येईल. पण ओरिसातील वादळाचा वेग ताशी अडीचशे किलोमीटर आणि सतत ------ तास टिकून राहिला होता. असो.
या झंझावाताने झाडे उन्मळून पडली. अगदी दहा-बारा मीटर घेराची झाडे देखील समुद्र पह्यांत एरवी दृष्टि पोचेल तिथपर्यंत उंच उंच नारळ, पोफळी, आणि ताडाची झाड दिसतात ती एकतर भुईसपार झाली किंवा निम्म्यांत मोडली किंवा त्यांची पान फाटून चोळामोळा, विदूप होऊन गेली. जिथे ही झाड रस्त्यांवर पडली तिथे रस्ते बंद झाले. घरांवर पडली तिथे छप्परं तुटून गेली. शेतात, ओठ्यांवर आणि कालव्यांवर या किना-यापासून त्या किना-यापर्यंत, अशी कुठे कुठे पडली. समुद्रात वाहून गेली.
ओरिसात कांही मुख्य शहरांतल्या मुख्य इमारती सोडल्या तर बहुतेक घरं मातीची. वर भाताच्या पेंढ्या टाकून शाकारलेली. पेंढ्यांखाली आधाराला
बांबू. त्या पेंढ्या उडाल्या, बांबू तुटू गेले!
तडाख्याच्या वा-याबरोबर पाऊस सुरू झाला आणि त्याने तीन-चार दिवस थैमान घातले. ज्या मातीच्या घरांची छपर उडून-तुटून गेली होती त्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. घरांत साठवलेल धान्य, कपडे, वह्या-पुस्तक सगळ त्या पाण्यांत भिजून नष्ट झाल. मातीच्या भिंतीवर पावसाचे तडाखे बसले आणि भिंती विरघळून जाऊ लागल्या- खचू लागल्या. कुठे पन्नास तर कुठे शंभर वर्षांपासून च्या भिंती आणि घरं ढेपाळत असतांना ते उघड्या डोळ्यांनी फक्त बघणे यापेक्षा हातात कांही उरले नव्हते.
किंवा ते बघायचे समाधान ते तरी होते कां? गांवात पक्की घर एखादे-दुसरीच. कुठे ती देखील नाहीत, पण मंदिर, मशीद, चर्च वगैरे इमारती पक्क्या. लोकांनी अशा घरांत आश्रम घेतला होता. वातावरण निवळल्यावर घरी परतले तेंव्हा फक्त खचलेली घरं उरली होती.
प्रत्येक गांवात मंदिर-मशीदींसारख्या धार्मिक इमारतींच्या जोडीला कांही सरकारी पक्क्या इमारती पण असतात. उदाहरणार्थ शाळा! तिथे लोकांना आश्रय घेता आला कां?
नाही-कारण सगळ्या शाळांवरची छप्पर आणि भिंती कमी-अधिक मोडून पडलेल्या होत्या. सरकारी इमारती अशा. तर सरकारीमाणसांची अवस्था याहून वाईट. वादळग्रस्त भागांत मदत म्हणून जे सामान पोचल- धान्य, ब्लँकेट्स, कपडे त्यांच योग्य वितरण होऊ शकेल अशी सरकारी यंत्रणाच नव्हती. त्याचे वेगवेगळे नमुने आणि वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.
महाराष्ट्राशी तुलना करायची म्हटली तर इथल्या बहुधा प्रत्येक गांवात तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचा सेक्रेटरी, .एन्.एम्, आंगणवाडी वर्ळर असे सरकारी यंत्रणेपैकी कोणी ना कोणी तरी उपलब्ध असते. नैसर्गिक आपत्ति नंतर त्यांनी तत्काळ प्रत्येक घरांतील जीवित वा मृत. व्यक्तिंचा तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा किंवा रिपोर्ट तयार करावा असे प्रशिक्षण मिळालेले असते. तहसिलदार, बीडीओ, तसेच प्रांत अधिकारी, कलेक्टर, सीईओ इत्यादि अधिकारी तत्काळ जागेवर जाऊन पोचतील अशी यंत्रणा असते. एखाद वेळी ही कोलमडते देखील. पण ओरिसात ही यंत्रणा अस्तित्वातच नव्हती. गांव पातळीवर जिथे जे सरकारी व्यक्ति होते ते निघून तरी गेलेले किंवा स्वतःचे घर सावरण्यांत गुंतलेले. तालुका व
वरिष्ठ अधिकारी राजकीय वरदहस्तामुळे पोस्टिंग मिळालेले म्हणून त्यांनाही मुख्यालयांत रहाणे बंधनकारक नाही. मुख्यमंत्री मुलाच्या आजारपणासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी वारंवार दिल्लीत तर मुख्य सचिव चक्क अमेरिकेत! इकडे कांय होईल असा प्रश्नाविचारल्यावर आमचे इतर अधिकारी सक्षम आहेत ते बघून घेतील हे उत्तर!
पारादीप मधे एका आय्..एस् अधिका-याच्या कर्तव्यदक्षतेचे खूप किस्से ऐकायला मिळाले. कांही खरे, कांही खोटे. कारण तो स्वतः याबाबत कांही बोलू शकत नाही. पण किस्सा असा कि हा अधिकारी दुसरीकडे कुठल्याशी पदावर होता. वादळाची बातमी ऐकून मिळेल त्या वाहनाने- म्हणजे कार, ट्रक, मोटर सायकल, होडी, सायकल इत्यादि करत तो पारादीपला पोचला. स्वतः एअरफोर्सचा अधिकारी असल्याच सांगत. मग बीडीओच्या ऑफिसमधे जाऊन बसला- कारण सर्व मदतवाटप तिथून होत होतं. पाहतो तो सामान जाऊन बसलेल बडीओ, राजकीय नेते व इतर लहान मोठ्या अधिका-यांच्या घरात. लोकांना तीन-तीन दिवस उपास घडत होता पण यांची घरं भरत होती. मग त्याने आर्मीला
सांगितले की माझी सरकारने येथे स्पेशल नियुक्ति केली आहे, माझा हुकुम ऐका आणि दोन तासाची मुदत देऊन सगळ सामान पुनः ऑफिसमधे जमा करवू घेतल. रेड टाकण्याची धमकी देऊन. मग स्वतः सर्व सामान वाटप व्यवस्थित करवून घेतल. सरकारने एक बर केल- त्याची तिथे स्पेशल ऑफिसर म्हणून ऑर्डर काढली. या कहाणीतील अतिरंजन किती , खर किती, हा प्रश्न सोडून देऊ कारण त्याला अजून त्याच सरकारमधे खूप वर्ष काढायची आहेत. मात्र सरकारी मदत म्हणून आलेली ब्लँकेट्स, पॉलीथीन इत्यादि थेट कलकच्यापर्यंत बाजारात विक्रीला पोचली होती हे ही तेवढच खरं!
भुवनेश्वर हे राजधानीच ठिकाण. बहुतेक सर्व घरं पक्की. त्यांच नुकसान कांही नाही. मात्र झाडं उन्मळून पडल्याने जागोजागी रस्त अडले होते. विजेच्या व फोनच्या तारा तुटल्या होत्या. नुकसा एवढेच. पण मंत्रालयात अधिकारी व कर्मचारी न येणे किंवा उशीरा येणे सुरु झाले. कारण कांय? तर या भयानक वादळामुळे जे नुकसान इतरत्र झाले असेल, त्याची कल्पना करून करून माझे हात-पाय गळाले! अस म्हणतात की निदान सेक्रेटरी पदाच्या अधिका-यांनी तरी दहा वाजता ऑफिसात हजर राहिलच पाहिजे असे सरकारला आदेश काढावे लागते!
वादळात तोंड द्यायचं आहे या इच्छा शक्तीचा सर्वत्र अभाव दिसून आला.
दिल्लीहून पहाणीसाठी गेलेल्या अधिका-याने एक किस्सा सांगितला- भुवनेश्वर कटक कलकत्ता हायवेवर त्यांची गाडी थांबली- पुढे ट्रँफिक जाम! उतरून पाहिल तर एक भल मोठ झाड रस्त्यावर आडव पडलेलं. कांही मुलं अजून जमीनीत रुतलेली पण बुंधा हलवता येऊ शकत होता. याने स्वतःचे दोन अधिकारी बोलावले व इतर अडलेल्या प्रवाशांना मदत करायला सांगितली तेंव्हा कुणी पाठ दुखते, हात दुखतात अस सांगत बाजूला झाले. शेवटी आर्मीच्या जीपमधला एक कॅप्टन व चार पाच सैनिक आले. सर्वांनी मिळून झाड हलबल. या प्रकारे सुमारे तेहतीस किलोमीटर रस्ता यांनी दहा-बारा झाड हलवून मोकळा केला पण मदतीला इतर कुणी पुढे आल नाही. इच्छा शक्ती नसण्याच हे ही एक उदाहरण.
वादळानंतर सुमारे महिन्याभराने मी तिकडे गेले असतांना चित्र जवळजवळ तेच होत. शाळा दुरुस्त करावी, निदान विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छ करावी- बाहेर उघड्यावर बसून कां होईना - पण वर्ग चालू ठेवावेत- वह्या पुस्तकं नसतील पण तोंडी शिक्षण सुरू ठेवावं- अस कांहीही कुठेही सुरू नव्हत. लोकांना रोजगार पुरवावा, असही चित्र नव्हत. जवळ जवळ दहा
जिल्ह्यांमधे शेती नष्ट झाली. त्यासाठी योजना किंवा आढावा नव्हता. किमान पाच ब्लॉक्स मधे जीवितहानी झाली. मुल, माणस अनाथ झाली- त्यांच्यासाठी योजना नव्हती. गांवागांवात बायका व मुली मेहनतीची काम करत होती- घराच्या मातीच्या भिंती पुनः बांधून काढायचा प्रयत्न करत होती पण तरुण मुल- पत्ते खेळत होती. नशीब चोरी- दरवड्यासाठी इकडे तिकडे जात नव्हती- अशीही एक प्रतिक्रिया!
खूप संस्थांनी स्वतःच्या ट्रक्स मधून मदत सामान आणल होत. पण सरकारी यंत्रणा नसल्याने हे ट्रक्स हायवेवर थांबून थोड सामान वाटून पुढे जात. तिथे थांबे करून बसलेली तरुण मंडळी सामान गोळा करत आणि पुनः जाऊन पत्ते खेळत बसत.
मात्र आंध्र प्रदेश कडून तातडीने जी मदत आली- टेलिफो संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी, रस्ते मोकळी करण्यासाठी आणि इतरही खूप प्रकारांनी- त्यामुळे मात्र आम्हाला चंद्राबाबू नायडूच मुख्यमंत्री हवेत असे म्हणणा-यांचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.
आज वादळानंतर तीन महिने होऊनही इच्छाशक्ती आहे कां ही शंका कायम रहाते. पण कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारी यंत्रणेत ती जाणवत नाही कां?

चक्रीवादळाने किंवा हायजॅकिंग सारख्या घटेमुळे ती थोडी उघडी पडते एवढेच!
------------------------------------------------------------------------

गुरुवार, 22 सितंबर 2016

6. चिंतामण मोरया

चिंतामण मोरया
                                   ... लीना मेहेंदळे

       माझ जन्मक्षेत्र धरणगांव, माझ्या आजोबांच्या तरुण वयात हे गांव तालुक्याचे शहर बनू शकेल या क्षमतेच होत.  तस झाल नाही कारण गांवाला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे साधन नाही, नदी नाही म्हणून ब्रिटिश राजवटीत धरणगांव ऐवजी पंधरा किलोमीटर दूर असलेल एरंडोल हे तालुक्याच ठिकाण झाल. अगदी अलीकडे - पाच सात वर्षापूर्वी धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत आला.
       माझा जन्म घरातच झाला.  आई सांगते, जेव्हा अस वाटल की आज उद्यात कांही तरी होणार आहे, तेव्हा घरातली सर्वांत मोठी खोली - म्हणजे देवघर रिकामी केली आणी खाट वगैरे टाकून तिथेच तयारी केली.  माझी आत्या आणी गांवातली एक सुईण यांनी मिळून बाळंतपण केल.  दुपारी दीड दोन ची वेळ होती.  वडील नोकरी निमित्त बाहेर होते. आजोबा दुपारच्या जेवणासाठी दुकानातून घरी आलेले.  मुलगी झाली समजल्यावर थोडया कष्टी मनाने दुकानात परत गेले.  दुपारी त्यांच्या कडे अचानक दोन तरुण आले.  साडेतीन हजार रुपये घेऊन. त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी तरी दुकानातून मोठी उधारी घेतली होती.  आर्थिक तंगी मुळे ती फेडायला जमली नव्हती. पुढे परिस्थिती सुधारली पण माणूस फार आजारी झाला.  त्यातच मरण पावला. पण मरतांना बजाऊन गेला 'अरे त्या सज्जन ब्राह्मणाचे पैसे बुडवू नका, वचन द्या.' म्हणूनच तेरावा उरकल्यावर दोघ मुल पैसे फेडायला माझ्या आजोबांकडे आली होती.
       मग तर आजोबांनी लगेच दुकान बंद केल - नवजात नातीसाठी सोन्याची चेन आणी शेजारी पाजारी वाटायला मिठाई घेऊनच आले.  बडी बेटी धनाची पेटी अस सर्वांना सांगून टाकल.  योगायोग असा की माझ्या दर वाढदिवसाला आई वडिलांना कुठून तरी लहान - मोठा अवचित धन लाभ होत आलेला आहे. रक्कम क्षुल्लकच असायची पण कुठेतरी केलेल्या कष्टाचा राहून गेलेला मेहनताना अस त्याच स्वरुप असायच.  माझे वडील उत्तम ज्योतिषी होते - पण पैसे घेत नसत.  मात्र आम्ही बिहार मध्ये होतो.  तिथे पध्दत अशी होती कि ज्योतिषाला काही तरी द्यावे.  तसेच बिहार मध्ये शेती उत्पन्नाची सुबत्ता फार.  म्हणून मग वडिलांकडे कधी भाज्या, कधी फळ, कधी मिठाई अशी आणली जायची.  असाच काहीसा लाभ माझ्या वाढदिवशी झाला, तर तो माझ्या नांवाने जमा होई.
       त्यामुळे जन्मापासून मी आजोबांची अतिशय लाडकी होते.  माझ्यावर कधीही हात उगारायचा नाही अशी घरांतील सर्वांना आजोबांची सक्त ताकीद होती.  माझ्या सगळयाच  सख्ख्या - चुलत - आते भावंडांनी लहानपणी कधी ना कधी मार खाल्लेला आहे.  पण मी मात्र थाटात असायची.
       आजोबा पंचक्रोशीत हुषार आणि हरिभक्त म्हणून गाजलेले होते.  सन्‌ एकोणवीसशे दहा मध्ये त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्न्यक्युलर फायनल (सातवी) परिक्षा पास होऊन आपल्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून लागले. पण त्यांच्या वडिलांनी सांगितले की नोकरी तुझ्या एकट्यापुरती राहील, त्याऐवजी संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे काहीतरी कर. म्हणून त्यांनी नोकरी सोडून देऊन गांवातली पहिली लाकडाची वखार टाकली आणि दुकानावर बसू लागले ते एकोणवीसशे पंचावन्न पर्यंत.


       त्या काळांत धरणगांव हे प्रत्यक्ष तालुक्याचे ठिकांण नसले तरी गांवाचा रुबाब इतर तालुका शहरांसारखाच होता.  धरणगांव ही एक मोठी बाजारपेठ होती.  त्या काळांत गांवात सिमेंटचे रस्ते होते.  गांवात विणकर समाज फार मोठा होता. तिथे हातमागावर तलम लुगडी, धोतर आणि सतरंज्या विणल्या जात.  धरणगांव, धुळे, सूरत अशा तीन मोठया बाजारपेठ त्यांना मिळत.  त्यामुळे आजोबांची वखार पण उत्तम चालली - शेजारी अजून कांही वखारी उभ्या राहिल्या.  वखारीच्या खरेदीसाठी आजोबा पार कलकत्त्या पर्यंत जात.  हे सर्व क्षेत्र गांवठाणाच्या थोड बाहेर, रेल्वे स्टेशनाच्या जवळ होते.  निधून थोड पलीकडे चिंतामण मोरयाचे मंदिर होते.  उत्तम पाषाण व फरश्यांनी बांधून काढलेल्या या मंदिरातील गणेश मूर्ति - स्वयंभू आहे.  या मंदिरात प्रत्येकाच्या मनातली - इच्छा पूर्ण होते असे मानतात.  आजोबांच्याही शंभर - दिडशे वर्ष मागे त्या मूर्तीचा जीर्णोद्वार करण्यांत आल्याचा संगमरवरी दगडावर कोरलेला आलेख आहे.  लहानपणी आजोबा मला इथे होऊन यायचे.  पाढे, स्तोत्र आणि गणित शिकवायचे, अस अंधुक अंधुक आठवत.  आजी खूप खूप पूर्वीच वारली. घरांत आजोबा, आई, आजोबांच्या धाकटया भावाचा मोठा गोतावळा व शिकण्यासाठी येऊन राहिलेली इतर नातेवाईक भावंड. त्या सर्वांना अभिमानाने माझ्या गणितातील प्रगति बद्दल आजोबा बोलून दाखवीत.
       मी सात वर्षाची असतांना वडिलांना मध्य प्रदेशात जबलपूर येथे कॉलेज मध्ये लेक्चररची नोकरी मिळाली.  तेव्हा आजोबांनी वाटे हिस्से केले.  वखार आपल्या धाकटया भावाकडे सुपूर्द केली आणी आम्ही जबलपूरला आलो.
       मला शाळेचा पहिला दिवस आठवतो.  मला सरळ तिसरी इयत्तेत घेतले होते.  तेव्हा तोंडी गणितांची परंपरा होती.  आजोबा तर उठ - सूठ तोंडी गणित विचारत आणि गणित सोडवण्याच्या नाना युक्त्या पण सांगत.  त्यांना लगेच उत्तर सांगून मी मोकळी होत असे.  पण शाळेत तस नव्हत.  पाटी वर उत्तरे लिहायची होती.  दहा तोंडी गणितांची दहा उत्तर.  त्यांत माझा उत्तरे लिहिण्याचा क्रम उलट सुलट झाला आणि माझी तीन उत्तर चुकली.  पन्नास पैकी फक्त पस्तीस मार्क.  मला रडू कोसळल. तेवढयांत मास्तर विचारू लागले -- सगळयांत जास्त मार्क पस्तीस - ते कोणी मिळवले ? कोण ही नविन मुलगी ? घरी आजोबांना हा किस्सा सांगितला.  तेव्हापासून ते पाटीवर उत्तरे लिहायची - सवय करुन घेऊ लागले.
       पुढे दोन वर्षांनी आजोबा वारले आणि आम्ही पण जबलपूर मध्य प्रदेश सोडून लांब दरभंगा, बिहार येथे गेलो.  मात्र दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत धरणगांवला येत राहिलो.  आजोबा साळी समाजाच्या सभागृहामध्ये भजन व कीर्तन करीत असत.  तिथेच वडिल महिनाभर दररोज सकाळी ज्ञानेश्वरी वर प्रवचन करू लागले. वडिलांचा  हा क्रम अव्याहतपणे सुमारे चाळीस वर्ष चालला.
       सुटीत धरणगांवला आल्यावर दररोज चिंतामण मोरयाच्या दर्शनाला जावे हा जणू नियमच ठरून गेला.  तसे गावात इतर बऱ्याच मंदिरात फेरफटका मारला जाई. पण गावकुसाबाहेर शेत आणि बाभळीच्या बनातून गेलेल्या पायवाटेने चिंतामण मोरयाला जाण्याची ओढ वेगळीच होती.  तिथे वेळ असेल त्या प्रमाणे प्रदक्षिणा व अथर्वशीर्षाचा पाठ आम्ही करीत होतो.  कधी फक्त एक तर कधी  एकदम एकवीस पर्यंत.  तिथे जाऊन मला नेहमी वाटे - याला कांय मागायच ? याला सगळी माहित आहेच.  पण इतर जण सांगत - अस नाही म्हणू - या मूर्तीपुढे आपले मन बोलून दाखवले - तर हवे ते मिळते.  आजही आमच्या घरांत काही अडले नडले तर पटकन्‌ मोरया, तुला नारळ फोडीन अस म्हटल जात.

      दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगांवला येणाच्या कार्यक्रमामुळे तिथले रस्ते असे तोंडपाठ की डोळे मिटून किंवा अंधारात चालेले तरी हरकत नाही.  आज इतकी वर्ष झाली पण ते सिमेंटचे रस्ते, धाब्याची घरे, दुकान, पिठाच्या गिरण्या, कोट (बाजाराची भली मोठी बांधीव जागा), मंदिर, शाळा, बरीचशी झाडे पण तश्शीच आहेत.  मात्र चिंतामण मोरयाचा परिसर बदलला.  गेल्या दहा वर्षात मंदिराच्या आसपास इतर बरीच मंदिर काढली आणि त्या छोटया परिसराला खेटून खूप घरं आणी खूप लोकवस्ती झाली.
       आता माझ धरणगावी किंवा मोरयाला फारस जाण होत नाही.  पण कुणीतरी धरणगांवचा वारसा सांगणारा संगणक शिकला आणि त्याने चक्क चिंतामण मोरया डॉट कॉम अशी साइट बनवून टाकली.  ज्यांनी मोरयाची प्रचीति घेतली आहे असे शेकडो लोक त्याला दुवा देत आपल्या संगणकावर मोरयाचे दर्शन घेत असणार यात मला शंकाच नाही. 
--------------------------------


                                 
 
       
































































5 भाप्रसे मधे काय असते - उत्तम करियर

बायो डाटा
धरणगांव, जिल्हा जळगाव येथे १९५० मधे जन्म. बिहार मधे  M.Sc. Physics पर्यंत शिक्षण व लेक्चररशिप. १९७४ ला IAS मधे प्रवेश. खानदेशातील पहिली महिला अधिकारी म्हणून मधुकरराव चौधरींनी खास तार पाठवून अभिनंदन केले. पुणे, औरंगाबाद, मुंबई, सांगली, नाशिक दिल्ली येथे विविध सरकारी पदांवर काम केले कलेक्टर, सीईओ, कमिशनर, उद्योग महामंडळ, राष्ट्रीय महिला आयोग, केंद्र शासनात पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च असोसिएशनची डायरेक्टर वगैरे कामे सांभाळली. महाराष्ट्रातून अतिरिक्त मुख्य सचिव या पदावुून निवृत्तिनंतर Member CAT व CIC, Goa ही पदे भूषविली. सांगली कलेक्टर असतांना केलेले देवदासी पुनर्वसनाचे काम बरेच नावाजले गेले.
उत्तम लेखक व वक्त्या म्हणून प्रसिद्ध. मराठी, हिंदी व इंग्रजीतून लिखाण. विषय बहुतेक प्रशासनिक व सामाजिक. सोबत बाल वाङमय, विज्ञान लेखन,  निसर्ग निरीक्षण, आणि इतर भाषांमधून मराठी व हिंदीत अनुवाद केले आहेत.
पुस्तके --- १) ये ये पावसा - बाल कथा संग्रह, २) सोनं देणारे पक्षी --  निसर्ग निरीक्षण, ३) नित्य लीला - मराठीत अनुवाद - कथासंग्रह ४) लोकशाही -- इंग्रजीतून अनुवाद ५) आनंदलोक -- कुसुमाग्रजांच्या शंभराहून अधिक कवितांचा हिंदी अनुवाद. हिंदीत इतर पाच पुस्तके. अणु विज्ञानावर दीर्घ लेखमाला आकाशवाणी सांगलीवरून प्रसारित.    
 लीना मेहेंदळे यांच्या लेखाला पुरवणी  पान २
------------------------------------------------------------
भारतीय सेवांच्या बाबतीत थोडे दाखले देऊन बोलायचे म्हटले तर या सेवांमधे ज्यांनी ठळकपणे उठून दिसणारी कामे केली अशी कित्येक उदाहरणे देता येतील. मुंबईत झोपडपट्टीत रहाणार्‍याचे प्रश्न हाताळणारे व नंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झालेले तिनईकरांचे उदाहरण घ्या. आजही झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांची जाण जेवढी त्यांना आहे तेवढी कुणालाच नसेल. मुंबई महानगरपालिकेचेच आयुक्त असलेल्या शरद काळे यांनी नगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गणवत्ता सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यावर आयसीआयसीआय बँकेपासून सर्वांनी त्या मधे सहभाग घेतला. पंजाब मधे अतिरेक्यांचा प्रश्न उसळला तेंव्हा कडक शिस्तीचा, कणखर पण तिथल्या लोकल पाँलिटिक्सच्या दृष्टीने त्रयस्थ अधिकार्‍याची गरज भासली तेंव्हा रिबेरो यांचीच निवड झाली. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रोढ शिक्षणाच्या कामासाठी संजीवनी कुट्टी, पंढरपुरच्या वारीमधे शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्यासाठी रमानाथ झा, ठाणे व नागपूर शहरांतील रस्ते सुधारण्यासाठी चंद्रशेखर, महिला धोरणासाठी चंद्रा अय्यंगार या सारख्या IAS अधिकार्‍यांची आठवण काढली जाते. वन अधिकारी म्हणून नोकरीत लागलेले मारुती चित्तमपल्ली उत्तम निसर्ग निरीक्षण व लिखाणासाठी प्रसिद्ध झाले ते नोकरीतील अनुभवांमुळेच. चांगल्या पोलिस प्रशासनासाठी सतीश साहनी, अरविंद ईनामदार, अनामी राय, मीरा बोरवणकर, यांची नांवे फक्त लोकच घेतात असे नाही तर त्यांचे संपूर्ण खातेच त्यांच्या चांगल्या कामाकडे आशेने डोळे लावून बसलेले असतात. मीरा बोरवणकर यांनी ओरंगाबाद व सातारा येथे DSP म्हणून जी उत्तम कामगिरी बजावली, किंवा जळगांव सेक्स स्कँडलचा पाठपुरावा ज्या हिरिरीने केला, त्यामुळेच आज त्यांचे मुंबईत पोस्टिंग झाल्याझाल्या जवळ जवळ प्रत्येक वर्तमानपत्राने त्यांचे स्वागत केले आहे. उत्कृष्ट कामाबाबत एवढी व्यापक पावती इतर कुठल्याही नोकरीत मिळू शकत नाही.
माझा स्वतचा अनुभव हेच सांगतो की चांगले प्रशासन पुरवण्याची कळकळ असलेले अधिकारी लोकांना दीर्घकाळ लक्षांत रहातात. याबाबत नुकताच झालेला एक संवाद आठवतो. तीन चार महिन्यांपूर्वी मी तेलगी प्रकरणाबद्दल लेख लिहिला होता. त्यांत तेलगी सारख्या प्रकरणी लौकर व पुरेशी शिक्षा न झाल्यास सचोटीने काम करणार्‍या अधिकार्‍यांचे कसे खच्चीकरण होत जाते इत्यादि लिहिले होते. लेख जरा परखडच होता. तो वाचून मुंबईहून एका व्यक्तीने मला फोन केला. मी सांगलीला कलेक्टर असताना नियमबाह्य किंवा बेजबाबदार वागणार्‍या दारुच्या दुकानांबाबत कसे कडक धोरण ठेवले होते, धनदांडग्यांना न जुमानता त्यांचे परवाने रद्द केले होते, प्रत्यक्ष गावात जाऊन मी पहाणी करीत असे आणि अंमलबजावणीबद्दल काटेकोर होते वगैरे गोष्टी त्या वेळी आठवी नववीत असलेला त्या गावातला एक विद्यार्थी पहात होता व त्या बद्दल त्याच्या मनात आदर निर्माण होत होता. एवढी वर्ष या घटना त्याने  लक्षांत ठेवल्या होत्या. आता माझा पत्ता माहित करून घेऊन मला फोन करीत होता. त्या गावांतील घटनेच्या दिवशीच त्यांच्या शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या नवजात मुलीचे नाव त्याने व त्याच्या मित्रांनी आग्रहाने लीना असे ठेवायला लावले होते. फोन वर हे सर्व ऐकत असताना मी अक्षरश अवाक्‌ झाले होते. भारतीय प्रशासनिक सेवेत येऊन योग्य प्रकारे काम केले तर त्याची पावती कुठल्या कुठल्या कान्या कोपर्‍यातून मिळत राहील तो अंदाज करणे अशक्यच. आसाम मेघालयच्या चीफ सेक्रेटरी असलेल्या प्रतिभा त्रिवेदी यांनी मला त्यांच्या आठवणीतला एक किस्सा सांगितला. त्या कधी एकदा खांडवा येथे असिस्टंट कलेक्टर असताना एका दुष्काळी गावात त्यांनी आपले सर्व अधिकार पणाला लावून दुष्काळी विहिरींचे काम करून घेतले होते. आता त्या रिटायर झाल्या आहेत. पण त्या गावातील शेतातला मेवा अजूनही त्यांच्याकडे आदराने नेऊन दिला जातो. कामाचे समाधान, चांगले काम करण्याची संधी, आणि त्या
कामासाठी लोकांनी दिलेली पावती जेवढी या नोकरीत आहे तेवढी इतरत्र कुठेही नाही. म्हणूनच ज्यांना देशासाठी, समाजासाठी व लोकांसाठी काही करायचे आहे त्यांच्यासाठी निश्चितच हे अतिशय उत्तम करियर आहे.
---------------------------------------------------------------

मंगलवार, 20 सितंबर 2016

5 घडीपत्रक

घडीपत्रक -- 

इथे वि

तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांना यावयास पाहिजे अशी प्रमुख कामे
) तांत्रिक कामे -
) मूळ जमाबंदी व पुनर्मोजणी कामाची माहिती.
)जमिनीची प्रतवारी व आकार ठरविणे.
) शंकु साखळी मोजणी, क्षेत्र काढणे.
) प्लेन टेबलने जमिनीची  हद्द बंदी, भूसंपीदन, अकृषिक व सविस्तर मोजणी, व त्या प्रकरणाचे परिनिरीक्षण.
) दुर्बिण मोजणी व अनुषंगिक गणित काम.
) जमीन महसूल संहिता १९६६, कलम २० () अन्वये चौकशी काम.
) सनद व मिळकत पत्रकाची.. माहिती.
) नगर भूमापन परिरक्षणाचे  काम.
) पुनर्विलोकन कामाची माहिती असणे व तपासणी करण्याचे  ज्ञान असावे.
१०) नगर भूमापनाचे आधिकार अभिलेख व नकीशा अद्ययावत ठेवणे.
११) गांव नमुना नंबर २ अद्ययावत आणणे.
१२) बिनशेती सारा आकारणी कायम करून घेणे.
१३) भूमी अभिलेख दुरूस्ती कामे , कमी जास्त पत्रक, आकारफोड, क्षेत्र काढणे.
१४) ले आऊट प्रमाणे भूमी अभिलेख दुरूस्ती करणे.
१५) तलाठी दप्तर तपासणी.
) भूमापन किंवा महसूल अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाची नकल व त्या संदर्भात इतर सर्व प्रकारचे कागदपत्र.
) फेरफार नोंदी / मिळकत पत्रिकेची नक्कल / किंवा इतर विहीत प्रपत्रांची  (prescribed form) नक्कल.
) नकाशाची  नक्कल.
ज्या कार्यालयांना झेरॉक्स मशीन पुरविणेत आल्या आहेत अशा सर्व कार्यालयांना यांकित प्रमाणित नकल देणे शक्य व्हावे म्हणून खालीलप्रमाणे तात्पुरत्या सूना देण्यांत येत आहेत ----
)झेरॉक्स मशीनवर ..याप्रत काढतांना ..याप्रतीसाठी  -३ साईजचा पांढरा कागद वापरावा.
) झेरॉक्स मशीनवर वापरून ए.३ साईज कागदा.. एका बाजूवर काढलेली प्रत प्रतेकी पां..( - रुपये मात्र )
) वरीलप्रमाणे नक्कल देतांना ..याप्रत करावया.. कागदां.. आकारमान कमी जास्त असले तरी एका बाजू.. झेराँक्स पेरत देणेयास ५- रुपये फी आकारणे.. आहे. हे तत्व लक्षांत घ्यावे. यामध्ये compering फी, कागद फी व प्रमाणित करण्या.. फी या सर्व बाबीम.. समावेश आहे.
) विहित परिमाणांत तयार केलेल्या कोणत्याही नकाशा.. नक्कल झेराँक्स मशीनवर देऊ नये. कारण नकाशा.. नक्कल झेराँक्स मशीनवर काढल्यास तो स्केलाप्रमाणे तंतोतंत १००% बरोबर निघेल या.. शाश्वती देता येत नाही. म्हणून सर्व नकाशां.. नकला पूर्वीप्रमाणे.. तयार करून पूर्वी विहित केलेल्या दराप्रमाणे.. फी आकारणे.. आहे. त्यामध्यें बदल करणेत आलेला नाही.
) झेराँक्स मशीनवर देण्यात येणार्या नकला संबंधित सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे.. आहेत.


सदर आदेशा.. अमलबजावणी त्वरीत होणए.. आहे. 

रविवार, 27 सितंबर 2015

5 महाराष्ट्रातील संगणक संस्कृती आज आणि उद्या

महाराष्ट्रातील संगणक संस्कृती आज आणि उद्या
लीना मेहेंदळे
..२०१०
(महाराष्ट्र साहित्य संस्कृति मंडळ यांच्या २०१० मधील संकलित ग्रंथासाठी)
संगणक म्हणजे दिलेल्या निर्देशाबरहुकूम उपलब्ध माहितीची छाननी करून निष्कर्ष काढू शकणारे यंत्र. जगभर मान्य असलेली ही व्याख्या पाहिली तर फार पुरातन काळातले साधे बेरीज करू शकणारे यंत्र देखील संगणक ठरते. पण आकड्यांची दशांश पद्धत द्बिअंशी पद्धतीत बदलून व इलेक्टानिक उपकरणांच्या सहाय्याने भाषा ते गणित असे आदानप्रदान करू शकणारे यंत्र या अर्थाने संगणकाचा विकास 1945 म्हणजॆ द्बितीय महायुद्ब संपता संपता झाला.

याच्या पूर्वासुरीचा आविष्कार म्हणजे बिनतारी माध्यमातून संदेश पाठवणे- म्हणजे आपली चिरपरिचित टपाल-तार खात्याची तार पाठण्याची पद्धत. त्या आविष्कारामधे जगदीशचंद्र बसु यांच्यासारखे भारतीय वैज्ञानिक होते ही अभिमानाची गोष्ट आहे पण हा वैत्रानिक सहभाग फक्त अपवाद म्हणावा लागेल.

संगणकाची- जागतिक स्तरातील वाटचाल व भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल एकाच सुमारास झाली. संगणक आधारित जेवढी कामे जगभरात होतात ते करणा-यामधे भारतीय कंपन्यांचा मोठा वाटा आहे व त्याचा फायदा भारताला निश्चितपणे होतो मात्र संगणकात जे जे नवीन घडते त्यात काम करणा-या भारतीय कंपन्याना अन्वेषकाता व उद्योजकता या दोन बाजूनी तपासले तर भारत फक्त दुस-यामधे आहे – पहिल्यामधे कुठेही नाही .

अशा भारताचा प्रगतीमधील मानबिंदू जो महाराष्ट्र, तिथे संगणक-संस्कृती कितपत रुजली -- 1960 ते 2010 वाटचाल कशी होती आणि 2010 ते 2060 ही वाटचाल कशी होईल याचा उहापोह करतांना संगणक, संगणक-संस्कृती, आणि संगणकीय मराठीची संस्कृती असे तीन भेद करून ही मांडणी करावी लागेल. संस्कृती कशी घडते या प्रश्नाला माझे उत्तर असे की एखादे तंत्रज्ञान सामान्य माणसापर्यत पोहोचून त्यांच्याकडून आत्मसात केले जाते तेंव्हा ती संस्कृती बनते. सामान्य माणूस संगणकाला वेगाने आत्मसात करीत आहे, पण त्यांत मराठी टक्का खूप कमी आहे.

संगणक विविध प्रकारची कामे करतो – त्याला हरकाम्या हे वर्णन चपखल ठरते. ढोबळ मानाने त्याची तीन तंत्र असतात – जडवस्तु-प्रणाली (हार्डवेअर), आज्ञावली (सॉफ्टवेअर) व आदानप्रदानाचे तंत्र (म्हणजे आपण आदेश कसे द्यायचे व त्याने परिणाम कशा पध्दतीने आपल्यासमोर ठेवायचे.

जडवस्तूमधे संगणकाची – पाटी (मॉनिटर) पेन्सिल (कीबोर्ड + माऊस ही दोन यंत्र), आणि संगणकाचा कारभारी डबा (सीपीयू) एवढी सामुग्री येते. कारभारी डब्याच्या आत एका मदरबोर्डवर संगणकाचा मेंदू (प्रोसेसर), मेंदूची स्वतःची पाटी (रॅम), संग्राहक -- (हार्ड डिस्क), विलग-संग्राहक (जसे की पेन ड्राइव्ह, सीडी, फ्लॉपी डिस्क इत्यादि), त्यांना चालवणारे ड्राइव्ह, संगणकाच्या कामाची सुरूवात करून देणारी बायोस नांवाची वेगळी चिप, जोडणाच्या तारा व केबल्स अशी उपकरणे असतात. या सर्व जडवस्तूंचे आकार – त्यांना जोडणा-या केबल्स, प्लग, सॉकेट्स इत्यादी सर्व बाबींचे स्टॅण्डर्डायझेशन करून IBM कंपनीने 1980 च्या आसपास मोठ्या प्रमाणावर संगणकांचे प्रॉडक्शन सुरू केले. ही स्टॅण्डर्डस् त्यानी सर्वांना जाहीर करून टाकल्याने इतरही उत्पादक कंपन्यानी हीच स्टॅण्डर्डस वापरली यामुळे संगणकाचे स्पेअर पार्टस् मिळणे, एकमेकांचे वापरले जाणे, यासारख्या सोई निर्माण होऊन संगणकाचा हार्डवेअरचा खप वाढला - अशा त-हेने संगणक संस्कृती सामान्य माणसापर्यत पोचवण्याचा पहिली टप्पा पार पडला.

हा हरकाम्या करू शकतो त्या कामाची यादी करायची तर टायपिंग, हिशोब ठेवणं, जगभर संदेश पोहोचवणं, चित्र, गाणी, व्हिडियो तयार किंवा एडिट करणं, फिल्म उद्योगात, बुकिंग-क्लार्क म्हणून, माहितीचा विश्लेषक म्हणून, अशा विविध प्रकारांनी संगणक काम करतो.

शासनांत संगणक संस्कृती यावी म्हणून केंद्र सरकारने 1981—82 मधे NIC नांवाचा एक नवा विभाग तयार करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संगणकावर काम होण्याच्या दृष्टीने एक एक संगणक-कोआर्डिनेटर नेमला-- त्याआधी फक्त रेलवेच्या काही मोजक्या आफिसेसमधेच जुन्या पद्धतीचे अवाढव्य आकारचे संगणक होते व पुढील कामाची दिशा ठरवण्याचे प्रयत्न फक्त रेलवे विभागात होत होते. तसेच शासनाकडील खूप मोठा डाटा साठवण्याच्या दृष्टीने परम नावाचा सुपर संगणक बनवण्याची योजना हाती घेऊन केंद्र सरकारने पुण्यांत सीडॅक या संस्थेची स्थापना केली. NIC व सीडॅक हे दोन्ही दूरदृष्टी ठेऊन घेतलेले व दूरगामी परिणाम देणारे टप्पे होते. मात्र माझ्या मते त्यांची वाटचाल तेवढ्या समर्थपणे झाली नाही.

सीडॅकमधे 16 मेगाबाइट साठवण क्षमता असलेला सुपर-संगणक तयार करुन अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवू हे स्वप्न रंगवले, मात्र ते पूर्ण करता आले नाही.(त्या काळातल्या संगणकांना 1 मेगाबाइटची साठवण-क्षमता खूप वाटत असे, आतातर 16 मेगाबाइटची साठवण-क्षमता अति क्षुल्लक मानली जाईल.)

त्याऐवजी सीडॅकला यश मिळाले ते त्यांच्याकडील तुलनेने छोट्या असलेल्या एका विभागाने केलेल्या कामामुळे -- ते म्हणजे संगणकावर भारतीय भाषेत व्यवहार करता यावा यासाठी विकसित केलेले सॉफ्टवेअर. इंग्रजीप्रमाणे मराठी फॉण्टसाठी पण स्टॅण्डर्ड हवे. ते भारत सरकारने 1991 मधेच तयार केले, त्याचे नांव इस्की, पण दुर्दैवाने ते लागू करण्यांत सरकारची इच्छाशक्ति कमी पडली. ज्या सीडॅकने हे स्टॅण्डर्ड तयार करण्यांत पुढाकार घेतला त्यांनीच आपले फॉण्ट व्यापारी तत्वावर विकून पैसा मिळवण्यासाठी ते स्टॅण्डर्ड बाजूला ठेवले. याचा तोटा देशाला अजूनही होत आहे कारण ते फॉण्ट स्टॅण्डर्ड नसल्याने इंटरनेटवर चालत नाहीत. तसेच त्यांची किंमत भरमसाठ ठेवल्याने (इंग्रजी फॉण्ट फुकट आणि यांची किंमत 15000 रुपये) कुणी ते घेईनात. त्यामुळे महाराष्ट्रांत संगणक संस्कृती रुजायला सुरुवात झाली तीच मुळी मराठीला खड्यासारखे बाजूला ठेऊन. याचा एक अप्रत्यक्ष परिणाम असा पण झाला की संगणक, वैज्ञानिक झेप, एकविसाव्या शतकाला मुठीत पकडणे या सर्वांचे नांव घेत सर्व शाळामधे पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्यांत आले तर कॉलेजमधेही मराठीऐवजी आय्.टी.चा पर्याय मान्य झाला.

मात्र त्या सॉफ्टवेअरमधे सीडॅकने एक चांगली गोष्ट केली होती. ती अशी की फॉण्टच्या जोडीला त्यांनी की-बोर्डाच्या लेआउटचा पण विचार केला. आधीपासून टायपिंग करणा-यांच्या सोईसाठी मराठी टाइपरायटरचाच लेआउट ठेवला असला तरी सोबत इन्स्क्रिप्ट नांवाचा अआइई...कखगघ... असा एक सरळसोट लेआउटपण दिला जो शिकायला खूपच सोपा आहे. या एकूण सॉफ्टवेअरच्या किंमती भरमसाठ ठेवल्याने व त्याची माहिती अजिबात न दिल्याने तो लेआउट लोकांपर्यंत पोचलाच नाही,

एकीकडे सीडॅकची ही त-हा तर जिल्ह्यांजिल्ह्यांत जे NIC कोऑर्डिनेटर्स नेमले त्यांची दुसरी त-हा. त्यांचे काम ठरवले डेटा-कलेक्शन व डोटा-प्रोसेसिंग. पण त्यांच्याकडून प्रत्यक्ष काय काम झाले ते गुह्यच राहिले. मी 1983 मधे सांगली जिल्हापरिषदेवर आले तेंव्हा माझा आग्रह होता की त्यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळीवरच संगणकाद्वारे विवेचन, मूल्यांकन आणि नीति-निर्धारण कसे करतात ते शिकवावे. पण त्यांची भूमिका डेटा-ग्रॅबिंगची होती हे माझ्या लक्षांत आले. ग्रॅबिंगची भूमिका असल्यावर ट्रेनिंग कसे देणार. तेंव्हापायून आतापर्यंत मीच स्वतः थोडे शिकून घेऊन आपल्या स्टाफला कांही शिकवायचे हे धोरण ठमवले. त्याचा मला वैयक्ति पाकळीवरहू खूप फायदा झाला.

ग्रॅबिंगच्या भूमिकेतून 1985 मधे NIC ने मोठ्या प्रमाणावर संगणकाचे डम्ब टर्मिनल्स घेऊन जिल्हाधिकारी व इतर कार्यालयांना पुरवण्याचा सपाटा लावला. तुम्ही डेटा-एण्ट्री करून तो डेटा आमच्याकडे सोपवा -- मग आम्हीच बुद्धिमान असल्याने त्याचे काय करायचे ते आमचे आम्ही बघून घेऊ अशी काहीशी अहंकाराची वागणूक त्यांत होती. परदेशांत दुकानांत दर पंधरा दिवसांनी सेल्सगर्ल बदलतात – तिथे ही डम्ब टर्मिनल्सची संस्कृती ठीक असते. हॉटेल्स चे ऱूम-बुकिंग, एअरलाइनचे चेक-इन काउंटर, रेल्वे रिझर्वेशनची काउंटर यासारख्या कामांना डम्ब टर्मिनल्स चालतात. पण शासनांत गांव-पातळीवरील तलाठी-ग्रामसेवकापासून वर पर्यंत एक-एक बलस्थान तयार झालेले असते. ते उपयोगाचे पण असते कारण थोड्या प्रशिक्षणाने त्यांचा चांगला वापर करता येतो. पण NIC च्या संगणक-धोरणामधे त्यांचा वापर फक्त मजूर म्हणून होणार होता. म्हणूनच सुरुवातीला काही वर्ष महसुली रेकॉर्डचे संगणकीकरण करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले.

आजही शासनांत स्टाफ ट्रेनिंगचा मुद्दा दुर्लक्षितच आहे.

1991 उजाडता- उजाडता संगणकाच्या किंमती निम्म्याने उतरल्या. आता तर डम्ब टर्मिनल्सचा आग्रह खूप चुकीचा होता. मग निर्बंध झुगारून काही विभागांनी इंटेलिजण्ट टर्मिनल्स म्हणजेच पीसी घेण्यास सुरुवात केली.

शासनांत संगणकाचा इपयोग किती
शासनांत संगणक संस्कृतीची खरी सुरुवात तेंव्हापासून झाली असे म्हणता येईल. तरीपण हा उपयोग फक्त टाइपरायटरचे काम करण्यापुरताच मर्यादित राहिला. संगणक म्हणजे ग्लोरिफाइड टाइपरायटर, अशीच समजूत आहे. अजूनही कित्येक कार्यालयांत संगणक व टाइपरायटरच्या किंमतींची तुलना करून संगणक घेण्याची परवानगी नाकारली जाते. सरकारांत संगणकाचा खरा उपयोग व्हायला हवा तो असलेल्या माहितीची सारणीबद्ध मांडणी करून (उदा. एक्सेल हे सॉफ्टवेअर वापरून) निष्कर्ष काढण्यासाठी. शासरीय कामांची विभागणी केल्यास चाळीस टक्के साणी विवेचन, तीीस टक्के टायपिंग व तीस टक्के इतर बरीच कामे अशी विभागणी होईल. पण संगणकाचा असा वापर हवा हे फक्त दहा टक्के सचिवांना कळतो व खालील स्टाफमधे तर याबाबत अज्ञानच आहे. इतर कामेमधे ईमेल, इंटरनेट सर्च, वेबपेजिंग (फक्त अपलोड करणे, डिझाइनिंग पण नाही), प्रेझेंटेशन, व तयार सॉफ्टवेअर वापरणे (उदा पगारपत्रकासाठी टॅली हे पॅकेज) अशा बाबी येतात.

शासनांत संगणकाचा इपयोग मराठीसाठी किती
पण टाइपरायटर म्हणून तरी संगणकांचा उपयोग मराठीसाठी किती प्रभावीपणे होतो. जे इंग्रजी टायपिस्ट किंवा स्टेनो म्हणून लागले, त्यांनी मराठी टायपिंगची परीक्षा पास झाली पाहिजे असा शासन-निर्णय 1985च्या आधीपासून आहे. संगणक नव्हते तेंव्हा मराठी टायपिंग शिकणे हा वैतागच होता, कारण इंग्रजीसारखाच मराठी टाइपरायटरचा की-बोर्ड लेआउट हाही उलटसुलट पद्धतीनेच असतो व त्याची परीक्षा पास होण्यासाठी सहा-आठ महिने क्लास लाऊन, दोन-दोन तास प्रक्टिस करावी लागते. शासनांत इन्क्रीमेट हवे असेल तर भाषा संचालनालयाची मराठी टायपिंग परीक्षा पास झालीच पाहिजे.

1960 ते 1990 या पिढीतील इंग्रजी टायपिस्ट किंवा स्टेनो यांनी मराठी टायपिंग संस्थांमधे क्लास लावून कधी कर्तव्यबुद्धीने त्या परीक्षेचे सर्टिफिकेट मिळवून घेतले तर कुणी सूट मिळावी म्हणून प्रयत्नांत राहिले. कांहींनी परीक्षा न देताच विभागातच आपले इन्क्रीमेंट मॅनेज केले तर कुणाला त्यांतही रिकव्हरीचा झक्कू लागला.

पण 1991 पासून सीडॅकचे सॉफ्टवेअर उपलब्ध होते, (जिस्ट, लीप-ऑफिस व इझम असे एकाहून एक प्रगत टप्पे) व त्यांच्या सर्व की-लेआउटमधे इन्स्क्रिप्ट लेआउटचा पर्याय होता. म्हणजेच मराठी वर्णमालेच्या क्रमाप्रमाणे अआइई.... कखगघ... असाच तो कीबोर्ड लेआउट असल्याने टायपिंग शिकणे शक्य व सोपे होते. ही माहिती वरिषठांना नव्हती, कारण मराठीसाठी संगणकांत कांय कांय आहे हे जाणून घेण्याची जबाबदारी कुणाची ते ठरलेले नाही. म्हमून मग शासकीय स्टाफला कुणी मार्गदर्शन केले नाही. स्वतः भाषा- संचालनालयामधे ही माहिती नसल्याने थेट 2009 पर्यंत संगणकावर परीक्षा घ्याव्यात हा विचारच त्या कार्यालयांत झाला नाही. माझ्याकडे त्या विभागाची जबाबदारी आल्यावर आता मात्र तिथल्या परीक्षा संगणकावर होऊ लागल्या आहेत आणि काही काळातच इन्स्क्रिप्ट लेआउट वापरल्यास ही परीक्षा अगदी सोपी जाते हे सर्वांना समजेल असा माझा आशावाद आहे. जोपर्यंत परीक्षाच टाइपरायटरवर होत्या तोपर्यंत संगणकावरील ही सोपी पद्धत शिकून टायपिंगच्या परीक्षेत कांही फायदा नव्हता पण सूट मिळण्यासाठी फायदा नक्कीच झाला असता.

जे कर्मचारी चतुर्थ श्रेणीमधून प्रमोशन मिळून क्लार्क झाले त्यांनी देखील टायपिंग टाळण्याचा प्रयत्न केला, त्यांना ही सोपी पद्धत दाखवली पाहिजे.

तसेच शासनांत नवीन क्लार्क भरती करतांना MSCITया शासनमान्य संस्थेची संगणक-परीक्षा पास व्हावे लागते, त्यासाठी तिथे क्लास लावले जातात. पण तिथेही अजून पूर्वीच्याच वेळखाऊ पद्धतीने मराठी टायपिंग शिकवले जाते. नुकतेच माजी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ग्रामीण मुलांना संगणकावर इन्स्क्रिप्टच्या सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग शिकवण्याचे वर्ग सुरू केले आहेत ते किती यशस्वी होतात ते पहायचे.

थोडे विषयांतर करून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. नुकतेच एका कर्नाटक काडरच्या मित्राकडून कळले की तिथेही हाच प्रश्न आहे, तिथल्या कन्नड टायपिंगच्या परीक्षा अजून टाइप- रायटरवरच होतात त्यामुळे इन्स्क्रिप्टच्या सोप्या पद्धतीने कन्नड टायपिंग शिकण्याचा पर्याय तिथेही चालत नाही. तोच प्रकार राजभाषा विभागाच्या हिंदी टायपिंगच्या परीक्षेचा आणि जवळपास देशांत सगळ्याच राज्यांमधील शासकीय टायपिंग परीक्षांचा.
या मुद्याला अति वरिष्ठ पातळीपर्यंत कोण उचलणार, तो दबावगट पण निर्माण करावा लागेल.

शासनामधे संगणक संस्कृती किती रुजली
आज शासनामधे संगणक संस्कृती किती रुजली याचे उत्तर बरेचसे दुखावणारे आहे. अधिका-यांपैकी नव्वद टक्के फक्त ईमेलपुरते संगणक वापरतात आणि तेवढ्यासाठी इंग्रजीचा की-लेआऊट उलटसुलट असूनही त्यांनी शिकून घेतलेला असतो. पण मराठीचा इन्स्क्रिप्ट हा अत्यंत सोपा की-लेआउट शिकून घेऊन मराठी वेबसाईट करण्याचे तसेच एक्सेलची सोय वापरून विभागाच्या कामगिरीचे विवेचन व नीती-निर्धारण करायचे या दोन बाबी त्यांना माहीतच नाहीत. त्यांच्या स्टाफमधे मराठी आणि इंग्रजी टंकलेखक येणारा एखादा क्लार्क असावा आणि त्याला प्रेझेंटेशन तयार करता आले तर छान. पण स्टाफचे ट्रेनिंग होण्याची जबाबदारी त्यांची नाही हाच बहुतेक सर्व वरिष्ठ अधिका-यांचा समज आहे. त्यामुळेच स्टाफमधे टंकन येणारे आणि न येणारे असा भेदही आहे. ज्यांना येत नाही त्यांनी तरी ही सोपी पद्धत शिकावी असं त्यांना कोण सांगणार.

यामुळे शासनाचे जिव्हाळ्याचे दोन कार्यक्रम रेंगाळले आहेत. माहिती अधिकाराचा आणि ई-गव्हर्नन्सचा.

शासनाची संकेतस्थळे व मराठी
माहिती अधिकाराखाली शासनाच्या संकेतस्थळावर प्रत्येक विभागाने माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. संकेतस्थळाची इंग्रजी प्रत नीट उघडते पण मराठी प्रत मात्र नीट उघडत नाहीत मग तक्रार ऐकावी लागते. याचे कारण की शासनांत मराठीसाठी वापरले जाणारे सर्व सीडॅक- फॉण्ट नॉन-स्टण्डर्ड असल्याने ते इंटरनेटवर चालत नाहीत. भारतीय इस्की स्टण्डर्ड न वापरले जाण्यामधे हे सीडॅकचे धोरणच कारणीभूत होते.

2000 च्या सुमारास जागतिक युनीकोड कन्सॉर्शियमने युनीकोड स्टॅण्डर्ड ठरवायला घेतली तेंव्हा कुणीतरी हा इन्स्क्रिप्टच्या सोपेपणाचा मुद्दा लक्षांत आणून दिल्याने सुदैवाने जागतिक स्तरावर तोच की-लेआउट भारतीय भाषांसाठी स्टॅण्डर्ड ठरवला गेला व अक्षराच्या वळणासाठी मंगल हा फॉण्ट स्टॅण्डर्ड ठरला. अजूनही शासनाकडील सर्व संगणकांवर युनीकोड स्टॅण्डर्डबरहुकूम मराठी फॉण्ट मंगल उपलब्ध नाहीच. तसेच अजूनही जागरूक गि-हाइक नसेल तिथे विक्रेते हा फॉण्ट देत नाहीत. अशावेळी सध्यातरी सीडॅकचा DVBTTSurekh हा फॉण्टच वापरला जातो व तो इंटरनेटवर चालत नाही. जिथे मंगल फॉण्ट आहे तिथे तो इन्स्क्रिप्ट लेआउटप्रमाणेच टाइप करावा लागतो त्याचे सोपेसे प्रशिक्षणही आपण स्टाफला दिलेले नाही हे सर्व सचिव विसरतात.

थोडक्यांत आपल्याकडे युनीकोड फॉण्ट असेल तरच ते टायपिंग इंटरनेटवर जाऊ शकेल पण त्या टाइपिंगसाठी इन्स्क्रिप्ट लेआउट वापरायला हवा. आणि युनीकोड फॉण्ट नसेल तरी DVBTTSurekh वर नव्याने इन्स्क्रिप्ट लेआउट शिकून घ्यायला काहीही श्रम पडत नाहीत. ते शिकून सवयीचे झाले तर पुढेमागे इंटरनेटवर माहिती टाकण्यासाठी ही सवय उपयोगी पडते. पण शासनाचे सुमारे नव्वद टक्के अधिकारी हे बारकावे जाणत नाहीत म्हणून शासनाची मराठी संकेतस्थळे नीट उघडत नाहीत.

नवीन फॅशन प्रमाणे शासनांतील अधिकारी व कर्मचारी यांनी हा सोपा इन्स्क्रिप्ट लेआउट शिकून कार्यक्षमता वाढवावी हा आग्रह आता कुणीही धरत नाही. त्याऐवजी आउटसोर्सिंगचा पर्याय निवडणे हे जास्त कार्य़क्षमतेचे लक्षण मानले जाते. त्यांत जास्त पैसा ओतावा लागत असल्याने ते जास्त ग्लॅमरसदेखील दिसते.

पुढील पिढीचे संगणक शिक्षण
पुढील पिढीला संगणक यावा ही शासनाची इच्छा आहे, त्यानुसार शाळांना संगणक देता यावेत असे सरकारचे प्रयत्न चालू आहेत. पण त्यांत मराठी असावे हा आग्रह नाही. खरेतर सरकारने पहिलीपासून इंग्रजी कम्पल्सरी केले, हेतू हा की मुलांना संगणक यावा, इंग्रजी यावे आणि त्यांच्यासाठी श्रीमंतीचे दार खुले व्हावे. श्रीमंती हवी असेल तर मराठी विसरा ही नवी फॅशन आहे. त्यांतच संगणकावर मराठी शिकणे अतिशय सोपे आहे हे माहित नसल्याने शालेय संगणक सिक्षणाच्या धोरणांत मराठीचा कुठे आग्रहच किंवा विचारच नाही. पण सरकारी अकडेवारीनुसार पहिलीपासून पाचवीत जाईपर्य़ंत पन्नास टक्के मुलं गळतात, त्यानी संगणकाचे स्वप्न पहायचेच नाही का? एका प्रयोगांत असे दिसते की सेगणकावर मुलांना आधी मराठी शिकवला तर तो लेआउट सोपा असल्याने त्यावर बोटांना सवय झाली की इंग्रजी शिकणे सोपे जाते. पण ते असो. मुद्दा हा की शालेय संगणक धोरणामधे मराठीचा विचार शून्य झालेला आहे.

आपल्याला आग्रह धरता येईल की शासनात आलेल्या सर्वांना इन्स्क्रिप्ट लेआउट शिकणे आवश्यक ठरवावे कारण तरच त्यांना ती दृष्टी येऊ शकेल. तसेच हाही आग्रह धरावा लागेल की शाळेतील मुलीमुलांना इन्स्क्रिप्ट लेआउटवर मराठी शिकवावे.

इंग्रजीऐवजी स्वतःची मातृभाषा वापरल्याने प्रगती होते का याच्या उत्त्तरासाठी चीनची ही आकडेवारी पहा --
2004 साक्षरता इंग्रजी-साक्षरता संगणक-साक्षरता
भारत 52 25 09
चीन 88 11 53
त्यांची संगणक-साक्षरता इंग्रजीसाठी अडून राहिली नाही.
इकडेही आता काकोडकर, नारळीकर, माशेलकर यांसारखे वैज्ञानिक सांगू लागलेत की मराठीतून शिक्षण द्या. पण ते सोपे आहे हेही सर्वांना सांगायला हवे.

मराठी एनेबलिंग
मात्र कांही छोट्या अडचणी आहेत, ज्या सोडवायला छोट्या छोट्या उपाययोजना कराव्या लागते.
) सर्व संगणकांतील ऑपरेटिंग सिस्टमला मराठी चालेलच अशी गॅरंटी दुर्दैवाने अजूनही शासनाने निर्माण केलेली नाही.
सबब, जुने संगणक असतील तर सीडॅकच्या साइटवरून आयलीप हे सॉफ्टवेअर फ्री डाउनलोड करून घ्यायचे व त्यावरून इन्स्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग शिकायचे आणि करायचे. कालांतराने एका वेगळ्या सॉफ्टवेअर वापरून हे सर्व युनीकोडमधे बदलून घेता येईल.
)महाराष्ट्रांत विकल्या जाणा-या सर्व संगणकांतील ऑपरेटिंग सिस्टमवर मराठीची सोय असलीच पाहिजे हा आग्रह शासनाकडे, विक्रेत्यांकडे, ग्राहक-पंचायतींकडे धरता येईल कारण तशी सोय सर्व नव्या संगणकांमधे असतेच फक्त आपण जागरूक नसल्याने ती आपल्याला दिली जात नाही, त्यासाठी कोणालाही वेगळा काही खर्त येत नाही.
) सीडॅककडे सुंदर सुंदर वळणांचे शंभरएक फ़ॉण्ट असूनही "देणार नाही, जा," या तत्वावर ते सुनीकोड कम्प्लायंट करण्यास नकार आहे, ते होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
) युनीकोडमुळे जगभर वाचता येऊ शकेल असा युनीकोड कम्प्लायंट एक फॉण्ट मंगल सध्या उपलब्ध आहे पण मुळांतच भारतीय लिप्यांची इंटरचेंजेबिलिटी व त्याचे फायदे युनीकोडमधे आग्रह न धरल्यामुळे आपण घालवून बसलो आहोत, R परत मिळवण्याचा आग्रह धरावा लागेल व हे काम छोटेसे नसून आता कदाचित डिप्लोमॅटिक पातळीवर उचलावे लागेल, ते झाले तर सरकारच्या इच्छाशक्तीचा तो एक मापदंड ठरेल.

मराठी साहित्यकार कुठे आहेत?
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या एक कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.
तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून महाजालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी !) धडाधड मराठी वाङ्.‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
मात्र सध्या असा जोरदार प्रचार चालू आहे की लेखकहो, तुम्ही मराठी लिपीला फाटा द्या. त्या लिपीत टंकन करण्याचा आग्रह सोडा, आम्ही तुम्हांला अशी जादू शिकवतो की तुम्ही रोमन लिपीत टंकन करायचे व संगणक ते मराठीत उमटवेल, अशा रितीने भारतीय लिप्यांची गरज संपेल. हा फोनेटिक पद्धतीचा ट्रॅप कांही वर्षांवासून चालू आहे, याबाबतही वेळेवरच जागं व्हायला हवं, विशेषतः इन्स्क्रिप्ट सोपे आहे म्हणून.
मराठी भाषा कुठे आहे?
जगभरांत मराठी किती बोलली जाते? एका आकडेवारीनुसार जगांत बोलल्या जाणा-या भाषा किती लोक बोलतात ती लोकसंख्या मोजली तर चीनी व इंग्रजीछ्या खालोखाल हिंदीचा नंबर तिसरा, बेगालीचा सातवा आणि मराठीचा तेरावा पण सर्व भारतीय भाषा एकत्र मोजल्या तर त्याचा नंबर पहिला लागतो. हे जेवढे अभिमानाचे आहे तेवढेच भाषा टिकवण्याची जबाबदारी उचला असा संदेशही देत आहे. आज संगणक सर्वव्यापी झाला आहे. त्याच्या प्रवासाचा आढावा घेतांना या जबाबदारीची जाणीव अंतर्मुख करणारी आहे.
शासनाने महाराष्ट्राचे सुवर्ण-जयंती वर्ष साजरे करण्यासाठी जो कार्य़क्रम केला आहे त्यांतही ंसगणक-विकासांत मराठी असावे यासाठी कोणताही कार्यक्रम सुचवलेला नाही.
उद्या कांय़

पुढील पन्नास लर्षांत संगणक संस्कृती किती रुजेल, याचे उत्तर आहे की मोठ्या प्रमाणावर रुजेल. शासनांत स्टाफचे संगणक शिक्षण बहुधा होणार नाही पण आउटसोर्सिंगमुळे शासनाची खूप कामे बाहेर, ज्यांना संगणक हाताळता येतात अशा संश्थांना दिली जातील. त्याने फायदा होईल की रिलायन्स वीजेप्रमाणे न परवडा-या दरांत शासनाची कामे होतील हे आजच सांगणे कठिण आहे. तसेच संगणकाचा वापर झपाट्याने वाढेल यांत शंका नाही. पण त्यांतून दोन गोष्यी बहुधा बाहेर टाकल्या जातील, एक मराठी आणि दुसरे गरीब लोक. ते होऊ नये असे वाटत असेल तर सतत आत्मपरीक्षण, आढावा, जागृती असे कांही केले तरच पुढील काळांत मराठी संस्कृती पुढे नेण्यांत संगणकाचा हातभार लागून मराठीचे जतन होऊ शकेल
---------------------------------------------------------------------------------------------------------------